Pankaja Munde's emotional appeal to activists over Gopinath Munde Punyatithi pnm | पंकजा मुंडेंची कार्यकर्त्यांना भावूक साद; २ जूनला बाबांनी स्वतःच्या घरी अखेरचं जेवण केलं अन्...

पंकजा मुंडेंची कार्यकर्त्यांना भावूक साद; २ जूनला बाबांनी स्वतःच्या घरी अखेरचं जेवण केलं अन्...

ठळक मुद्दे३ जून रोजी नागरिकांनी आपापल्या घरात मुंडे साहेबांचा फोटो समोर उभे रहादुपारी १२ ते संध्याकाळी ६ या वेळेत अन्नदान, रक्तदान, मास्क किंवा औषधाचे वाटप करापुण्यतिथीचा कार्यक्रम लाईव्ह असेल, कोणीही गडावर गर्दी करु नये, पंकजा मुंडेंचं आवाहन

मुंबई - भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीला साहेबांच्या आवडीचा पदार्थ करायचा आणि घरातच फोटोसमोर दोन दिवे लावून त्यांना अभिवादन करायचं असं आवाहन त्यांची कन्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे. ३ जून रोजी गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम गोपीनाथ गडावरच होईल, मात्र कार्यक्रम लाईव्ह असेल, कोणीही गडावर गर्दी करु नये अशी सूचनाही पंकजा मुंडे यांनी केली आहे.

पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत सांगितलं आहे की, ३ जून हा दिवस उजाडलाच नाही पाहिजे, असं वाटतं. ३ जून रोजी लोकनेते गोपीनाथराव  मुंडे यांचा सहावा पुण्यस्मरण दिवस आहे. हा दिवस ‘संघर्ष दिन’ म्हणून मुंडे समर्थक साजरा करतात. परंतु सध्या कोरोनामुळे राज्यासह बीड जिल्ह्यातही लॉकडाऊन आहे. शिवाय गर्दीच्या सर्वच कार्यक्रमावर बंदी आहे. गोपीनाथ गडावर सध्या पद्धतीने मोजक्या लोकांमध्ये गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी कार्यक्रम होणार आहे. पुण्यतिथीचा कार्यक्रम सोशल मीडियाद्वारे लाईव्ह होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी दर्शन घेण्यासाठी किंवा मला भेटण्यासाठी येऊ नये, असा संदेश पंकजा मुंडे यांनी दिला आहे.

तसेच २ जून रोजी बाबा घरी पोटभर रस-पोळी खाऊन गेले होते. स्वतःच्या घरी तेच त्यांचं अखेरचं जेवण, ३ जून रोजी त्यांचे पार्थिव देखील घरी आणता आले नाही. त्यामुळे ३ जून हा दिवस उजाडलाच नाही पाहिजे. अशा भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या.

पुण्यतिथीला कराल ना हे – पंकजा मुंडेंची विनंती

३ जून रोजी नागरिकांनी आपापल्या घरात मुंडे साहेबांचा फोटो समोर उभे रहा. उजव्या बाजूला घरातील महिला, तर डाव्या बाजूला पुरुष उभे राहतील. आजी, सून, नात उजवीकडे तर आजोबा, मुलगा,नातू डावीकडे असं उभा राहून  दोन समई किंवा दिवे लावून अभिवादन करा. मुंडे साहेबांच्या आवडीचा पदार्थ करा, तो काय हे मी सांगायची गरज नाही. हे दोन दिवे लावण्यास मी सांगितले ते स्त्री आणि पुरुष समानतेचा संदेश देणारे आणि समानता जगणारे म्हणून लावायचे असंही मुंडे यांनी सांगितलं. दुपारी १२ ते संध्याकाळी ६ या वेळेत अन्नदान, रक्तदान, मास्क किंवा औषधाचे वाटप करा, त्याचे फोटो माझ्या सोशल मीडियावर पाठवा, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वतःला जपा, गर्दी करू नका, घरात रहा, तुमच्या जीवाची काळजी साहेबांच्या एवढीच मला आहे, कराल ना मग एवढं? अशी भावूक साद पंकजा मुंडे यांनी घातली आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

मुस्लीम मृतदेह दफन करण्यास ५ कब्रस्तानचा विरोध; हिंदूंनी दिली स्मशानभूमीत जागा

...अन् २ वर्षापूर्वी दुरावलेल्या बाप-लेकाची भेट घडली; एका टिकटॉक व्हिडीओनं कशी केली कमाल?

लाखो रुपये किंमतीची भगवान श्रीकृष्णाची मूर्ती सापडली; विहिरीच्या तळातून बाहेर काढण्यात यश

पालकांनो, आपल्या मुलांकडे लक्ष द्या; लॉकडाऊनमुळे १२ वर्षाच्या मुलाची आत्महत्या, कारण...

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Pankaja Munde's emotional appeal to activists over Gopinath Munde Punyatithi pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.