Lockdown: पालकांनो, आपल्या मुलांकडे लक्ष द्या; लॉकडाऊनमुळे १२ वर्षाच्या मुलाची आत्महत्या, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 11:27 AM2020-05-29T11:27:13+5:302020-05-29T11:34:15+5:30

घरातून बाहेर पडता येत नाही, खेळायला मिळत नाही म्हणून १२ वर्षीय सलीम(नावात बदल)ने आत्महत्या केली आहे

Lockdown: 12-year-old boy commits suicide due to lockdown in mumbai pnm | Lockdown: पालकांनो, आपल्या मुलांकडे लक्ष द्या; लॉकडाऊनमुळे १२ वर्षाच्या मुलाची आत्महत्या, कारण...

Lockdown: पालकांनो, आपल्या मुलांकडे लक्ष द्या; लॉकडाऊनमुळे १२ वर्षाच्या मुलाची आत्महत्या, कारण...

googlenewsNext
ठळक मुद्देमुलाला पूर्ण झोप येत आहे की नाही याची काळजी घ्याघराबाहेर पडता येत नाही म्हणून मुलांमध्ये तणावसोशल मीडियावर वेळ घालवण्याऐवजी पालकांनी मुलांबरोबर गप्पा माराव्यात.

मुंबई – सध्या देशात कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी गेल्या २ महिन्यापासून लॉकडाऊन सुरु आहे. या काळात अनेकांना घरातचं राहणं बंधनकारक आहे. मात्र लॉकडाऊनचा विपरीत परिणाम लोकांच्या मानसिकतेवर दिसून येत असल्याचं समोर येत आहे. मुंबईच्या मीरा-भाईंदरमध्ये लॉकडाऊनमुळे घरातून बाहेर पडता येत नाही म्हणून १२ वर्षाच्या मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

घरातून बाहेर पडता येत नाही, खेळायला मिळत नाही म्हणून १२ वर्षीय सलीम(नावात बदल)ने आत्महत्या केली आहे. सलीम मीरा-रोडच्या एका शाळेत सहावीच्या वर्गात शिकतो. २५ मे रोजी ईद साजरी करुन तो रात्री दीड वाजता झोपला. दुसऱ्या दिवशी ६ वाजेपर्यंत तो रुममध्ये झोपला होता असं त्याच्या वडिलांनी सांगितले. सकाळी ७ च्या सुमारास आम्ही रुममध्ये गेलो तेव्हा त्याला पंख्याला लटकलेले पाहिले. सलीमला रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

वडिलांनी सांगितले की, आमचा मुलगा दररोज संध्याकाळी लॉकडाऊनपूर्वी पार्कमध्ये सायकल चालवणे आणि खेळण्यासाठी जात होता. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या टप्प्यात बाहेर जाण्याचा त्यांनी आग्रह धरला, परंतु वारंवार नकार दिल्यानंतर त्याने मान्य केले. पंख्याला लटकण्याआधी त्याने घरातून व्हॉट्सअॅपवर एका मित्राला घरात बोअर होत असल्याचं बोलला होता. बाहेर जाता येत नाही म्हणून तो इतका उदास झाला आहे याची आम्हाला खरोखरच कल्पना नव्हती, अन्यथा आम्ही त्याला खेळायला आणि स्वतः फिरवण्यासाठी घेऊन गेलो असतो. तो खूप सक्रिय मुलगा आणि वर्ग मॉनिटर होता असं त्याच्या शिक्षकांनी सांगितले.

मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर एस. दानिश यांनी सांगितले की, लॉकडाऊनचा मुलांवर भावनिक परिणाम होतो. ते नैराश्याने ग्रस्त आहेत. मुलांना असे वाटते की ते जाळ्यात अडकले आहेत. म्हणूनच लॉकडाऊनमध्ये मुलांवर विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मुलांमधील उदासिनता त्याच्या वागणुकीतील बदलांद्वारे ओळखली जाऊ शकते. जेव्हा मूल तणावाखाली असते तेव्हा ते नेहमीच काही संकेत देते.

या गोष्टी लक्षात ठेवा

सोशल मीडियावर वेळ घालवण्याऐवजी पालकांनी मुलांबरोबर गप्पा माराव्यात.

मुलांना सोशल मीडियाचे जास्त व्यसन होऊ देऊ नका.

मुलांमध्ये नवीन छंद निर्माण करा.

मुलाला पूर्ण झोप येत आहे की नाही याची काळजी घ्या

अन्य महत्त्वाच्या बातम्या

मुस्लीम मृतदेह दफन करण्यास ५ कब्रस्तानचा विरोध; हिंदूंनी दिली स्मशानभूमीत जागा

...अन् २ वर्षापूर्वी दुरावलेल्या बाप-लेकाची भेट घडली; एका टिकटॉक व्हिडीओनं कशी केली कमाल?

लाखो रुपये किंमतीची भगवान श्रीकृष्णाची मूर्ती सापडली; विहिरीच्या तळातून बाहेर काढण्यात यश

नवनिर्माण आता मराठी माणसाच्या हाती; कोरोनामुळे संधी आली चालून- राजू पाटील

Web Title: Lockdown: 12-year-old boy commits suicide due to lockdown in mumbai pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.