शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाण्याने पंचगंगेची गटारगंगा

By admin | Updated: June 4, 2015 04:13 IST

कोल्हापूर व इचलकरंजीमधील नागरी वसाहतीतील मैला व सांडपाणी हेच पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचे सर्वांत महत्त्वाचे व मुख्य कारण आहे.

विश्वास पाटील, कोल्हापूरकोल्हापूर व इचलकरंजीमधील नागरी वसाहतीतील मैला व सांडपाणी हेच पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचे सर्वांत महत्त्वाचे व मुख्य कारण आहे. नदीत मिसळणाऱ्या सांडपाण्यापैकी तब्बल ८७.५७ टक्के पाणी कोल्हापूर महापालिका, इचलकरंजी नगरपालिका व परिसरातील गावांमधून येते. तर उद्योगांपासून निर्माण होणाऱ्या प्रदूषित पाण्याचे प्रमाण १२.४३ टक्के इतके आहे. प्रदूषणास जबाबदार घटकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.प्रदूषण रोखण्याची कायद्याने सर्वाधिक महत्त्वाची जबाबदारी असणाऱ्या घटकांनीच नदीची गटारगंगा केली आहे. ‘पर्यावरण दिना’च्या (५ जून) पार्श्वभूमीवर पंचगंगेच्या सद्य:स्थितीचा शोध घेण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गतवर्षी पंचगंगा नदी प्रदूषणाचा अत्यंत तपशीलवार कृती आराखडा केला. त्यामध्ये तीन स्थानिक स्वराज्य संस्थांनाच प्रदूषणासाठी जबाबदार धरण्यात आले. उच्च न्यायालयातील याचिकेमध्येही हाच मुद्दा अधोरेखित करण्यात आला आहे. न्यायालयाने प्रदूषणाची पाहणी करण्यासाठी ‘नॅशनल एनव्हार्यमेंटल इंजिनियरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट’ची (निरी) समिती नियुक्त केली. समितीने केलेल्या शिफारशी व उच्च न्यायालयाच्या रेट्यामुळे प्रदूषण रोखण्याची कार्यवाही काही प्रमाणात सुरू झाली, परंतु त्यास अपेक्षित वेग नाही. कोल्हापूर व इचलकरंजी वगळता इतर भागांत मैला व सांडपाणी वाहून नेणारी यंत्रणा नाही. कोल्हापूरमध्ये फक्त एकतृतीयांश भागातच मैलावाहिन्या आहेत. येथे ४३.५ दशलक्ष लिटर पाण्यावरच प्राथमिक प्रक्रिया होते. उर्वरित पाणी गेल्या २५ वर्षांपासून प्रक्रियेशिवायच नदीत मिसळत आहे. इचलकरंजीने २० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेची यंत्रणा उभारली. मात्र, त्यातही १२ दशलक्ष लिटर सांडपाण्यावरच प्रक्रिया होते. उर्वरित प्रदूषित पाणी नदीत मिसळते.