शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

पानसरे हत्येचे चारशे पानी पुरवणी दोषारोपपत्र दाखल; चौघांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 1:53 AM

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्याप्रकरणी आजअखेर केलेल्या तपासाचे ४०० पानी पुरवणी दोषारोपपत्र ‘एसआयटी’ने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. राऊळ यांच्याकडे सोमवारी दाखल केले.

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्याप्रकरणी आजअखेर केलेल्या तपासाचे ४०० पानी पुरवणी दोषारोपपत्र ‘एसआयटी’ने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. राऊळ यांच्याकडे सोमवारी दाखल केले.आरोपपत्रामध्ये संशयित अमोल काळे (वय ३५, रा. पिंपरी-चिंचवड), वासुदेव सूर्यवंशी (२९, रा. जळगाव), भरत कुरणे (३७, रा. बेळगाव), अमित डेगवेकर (३८, रा. दोडामार्ग, सिंधुदुर्ग) या चौघांचा पानसरे हत्येमध्ये प्रत्यक्ष सहभाग असून खून, खुनाचा प्रयत्न, साक्षीदारांच्या मदतीने हत्येचाकट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. सुमारे ८५ साक्षीदारांचे जबाब घेतले आहेत.विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी एसआयटीचे तपास अधिकारी तथा अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्याकडून दोषारोपपत्र न्यायालयासमोर सादर केले.आजपर्यंत केलेल्या तपासाचा पुरवणी अहवाल एसआयटीने यापूर्वी उच्च न्यायालयात सादर केला आहे. पुरवणी दोषारोपपत्रामध्ये चौघा संशयितांकडून काही महत्त्वाचे पुरावे हाती लागले असून, ते पुराव्यानिशी न्यायालयासमोर सादर केले आहेत. हा संपूर्ण तपास गोपनीय आहे.तपासाबाबत उलट-सुलट चर्चासंशयित तावडेने कुरणेकडे पिस्तूल दिले. त्याने ते बेळगावला नेऊन नष्ट केले; तर सूर्यवंशी याने मोटारसायकलींची विल्हेवाट लावल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तपासामध्ये संशयितांकडून पिस्तूल आणि दुचाकी हस्तगत झाली नाही. पानसरे हत्येमध्ये गोळ्या झाडल्याचा आरोप सनातन संस्थेचे साधक विनय बाबूराव पवार (रा. उंब्रज, जि. सातारा) व सारंग दिलीप अकोळकर (रा. चिंतामणी अपार्टमेंट, पुणे) यांच्यावर केला आहे. दोघेही फरार आहेत. आतापर्यंत या गुन्ह्यात आठ आरोपी निष्पन्न झाले आहेत. त्यापैकी सहाजणांना अटक केली.दोष सिद्ध झाल्यास शिक्षासंशयितांच्या विरोधात १२० (ब), कट रचणे, १०९ मदत करणे, ३०२ खुनाचा प्रयत्न, संगनमत करणे (३४), यासह बेकायदेशीर घातक शस्त्रे जवळ बाळगल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. संशयितांवर दोष सिद्ध झाल्यास आजन्म कारावास किंवा फाशीची शिक्षा होऊ शकते, असे अ‍ॅड. राणे यांनी सांगितले.

टॅग्स :Govind Pansareगोविंद पानसरे