शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
4
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
5
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
6
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
7
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
8
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
9
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
10
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
11
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
12
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
13
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
14
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
15
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
16
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
17
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
18
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
19
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
20
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

कुऱ्ह्यात पाकिस्तान जिंदाबादचे नारे !

By admin | Updated: October 10, 2016 16:12 IST

तिवसा तालुक्यातील कुऱ्हा येथे रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास मोठ्या देवी परिसरातून मोहर्रमचा जुलूस जात असताना काहींनी ‘पाकिस्तान जिंदाबाद

ऑनलाइन लोकमत

अमरावती, दि.10 -  तिवसा तालुक्यातील कुऱ्हा येथे रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास मोठ्या देवी परिसरातून मोहर्रमचा जुलूस जात असताना काहींनी ‘पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्थान मुर्दाबादचे’ नारे दिले. यामुळे संतप्त तरूणांनी कुऱ्हा ठाण्यात धाव घेतली. आरोपींना अटक करण्याऐवजी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी आले असता त्यांनी जमावावर लाठीचार्ज करण्याचे आदेश दिलेत. यामुळे संतप्त जमावाने कुऱ्हा पोलीस ठाण्यावर दगडफेक केली व एसडीओंचे वाहन जाळण्याचा प्रयत्न केला. तसेच आवारातील अन्य वाहनांच्या काचा फोडल्या.कुऱ्हा येथे मोठ्या देवी संस्थानमध्ये रविवारी सायंकाळी अष्टमीनिमित्त होमहवन व भजनाचा कार्यक्रम होता. रात्री ८ वाजताच्या सुमारास या परिसरातून मोहर्रमची मिरवणूक जात असताना मिरवणुकीतील काहींनी ‘पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्थान मुर्दाबाद’चे नारे दिल्याचा आरोप मोठ्या देवी परिसरात उपस्थित नागरिकांनी केला. जुलूस पुढे सरकताच या युवकांनी कुऱ्हा ठाणे गाठले व ठाणेदार कांबळे यांना घटनेची माहिती दिली. ठाणेदारांनी या युवकांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, देशविरोधी नारेबाजी करणाऱ्यांना पोलीस अटक करीत नाहीत, अशी भावना निर्माण होऊन जामावातील काही तरूणांनी ठाणेदारांच्या निवासस्थानावर व कक्षावर दगडफेक केली. दरम्यान तेथे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीनिवास घाडगे आले व त्यांना जमावावर लाठीचार्ज करण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे संतप्त जमावाने एसडीपीओंचे वाहन जाळण्याचा प्रयत्न केला व ठाण्याच्या आवारातील काही वाहनांच्या काचा फोडल्या. काही वेळात दंगाविरोधी पथक व तिवसा आणि मंगरूळ येथील पोलीसांची कुमक आली व जमाव पांगला. दरम्यान युवकांच्या तक्रारीवरून मोहर्रम कमेटीच्या ५ सदस्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली. कुऱ्हा पोलिसांच्या तक्रारीवरून १५ हिंदू तरूणांविरूद्ध कुऱ्हा पोलिसांनी भादंवीच्या कलम ३५३, ३३२, १४३, १४८, १४७ अन्वये तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान कलम ३ व ४ तसेच क्रिमिनल लॉ अमेनमेंट ७ अन्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. कुऱ्हा येथे तणावपूर्ण शांतता आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी गावात ठाण मांडून आहेत.