मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवार, १९ जुलै रोजी आदरांजली सभा आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्ताने कामठी रोड, नागपूर येथील गुरूद्वारा सिंग सभेचे पाई मुख्त्येयार सिंगजी (पुणावाले) यांचे कीर्तन होणार आहे. ...
येथे संभाजी ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षावर हल्ला झाला होता. त्यानंतर जमावाने वसंतनगर पोलीस ठाण्यावर हल्लाबोल केला. या घटनेची माहिती मिळताच अमरावतीचे पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी बुधवारी सायंकाळी पुसदला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. ...
आगारात असलेल्या बहुतांश बस कालबाह्य झाल्या आहेत. या मोडक्या-तोडक्या बसमधून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. एकीकडे विमानतळाच्या धर्तीवर बसस्थानकांच्या विकासाची स्वप्ने दाखवायची आणि दुसरीकडे कालबाह्य बसेस प्रवाशांच्या सेवेत ठेवायच्या. ...
ललित कलांच्या संवर्धनार्थ कार्य करणाऱ्या संस्कार भारतीच्यावतीने शहरातील साहित्य, चित्रकला, क्रीडा व समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या ज्येष्ठांचे गुरुपौर्णिमेनिमित्त पूजन करण्यात आले. ...
जगात असे कोणतेच क्षेत्र नाही जिथे महिलांनी कर्तृत्वाचा ठसा उमटविला नसेल. स्वत:च्या कुटुंबाला आकार देण्यासह देशाच्या विकासात आणि समाजाच्या जडणघडणीत नेहमीच महिलांचे योगदान मोठे राहिले आहे. किंबहुना त्यांचे कर्तृत्व काकणभर सरसच ठरले आहे. विदर्भातही अशा ...
जगणे मुश्किल करणाऱ्या दारुड्या मुलाची एका वृद्ध पित्याने हत्या केली. बेसा मार्गावरील अलंकारनगरात बुधवारी मध्यरात्री हा थरार घडला. मुलाच्या हत्येचे पातक घडल्यामुळे पश्चात्ताप झालेल्या पित्याने स्वत:च पोलीस ठाण्यात जाऊन अटक करवून घेतली. ...
गेल्या काही वर्षांमध्ये गटातटाचे राजकारण ही काँग्रेसची ओळख बनली आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरार यांनी गटातटाचे राजकारण न करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. ...