Reflections on Chief Minister's bankruptcy, Congress criticism on Goa budget | मुख्यमंत्र्यांच्या दिवाळखोरीचं प्रतिबिंब, गोवा अर्थसंकल्पावर काँग्रेसची टीका
मुख्यमंत्र्यांच्या दिवाळखोरीचं प्रतिबिंब, गोवा अर्थसंकल्पावर काँग्रेसची टीका

पणजी : अर्थसंकल्प तयार करण्यासाठी संबंधित घटकांशी चर्चा विनिमय करण्यास सरकारला वेळच मिळाला नाही. कारण, हे सरकार गेली चार-पाच महिने आमदारांची फोडाफोडी आणि राजकारण करण्यातच व्यस्त होते, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे. 

मुख्यमंत्र्यांना अर्थव्यवस्थेचा पायाच समजलेला नाही, अशी टीका करुन हा अर्थसंकल्प मुख्यमंत्र्यांच्या दिवाळखोरीचे प्रतिबिंब असल्याचे म्हटले आहे. निवडणूक प्रचारासारखाच हा अर्थसंकल्प असून अर्थव्यवस्थेला कोणतीही दिशा देणारा नाही. सर्वसामान्य जनतेसाठी या अर्थसंकल्पात काहीही नाही. करांबाबत भाष्य केलेले नाही, त्यामुळे छुपे कर आहेत का हे कळायला मार्ग नाही. खाणबंदीमुळे महसूल मिळणे बंद झालेले आहे. पर्यटन उद्योगही मारला जातोय, नागरिकांना अंधारात ठेवून तयार केलेला हा आंधळा अर्थसंकल्प असल्याची टीकाही चोडणकर यांनी केली. 
 


Web Title: Reflections on Chief Minister's bankruptcy, Congress criticism on Goa budget
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.