शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

एसटीत फक्त ३० दिवसांत ३५ कोटींचा ओव्हरटाइम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 10:44 IST

ST Bus News: राज्य मार्ग परिवहन (एस.टी.) महामंडळाने ऑक्टोबरमध्ये सुमारे ३५ कोटी रुपये कर्मचाऱ्यांच्या ओव्हरटाईमवर खर्च केले आहेत. सूत्रांच्या म्हणण्यानुसार एस.टी.च्या इतिहासात ओव्हरटाईमवर प्रथमच एवढा मोठा खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे आता कमी मूळ वेतन (बेसिक) असलेल्यांनाच जादा कामाचा मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई -  राज्य मार्ग परिवहन (एस.टी.) महामंडळाने ऑक्टोबरमध्ये सुमारे ३५ कोटी रुपये कर्मचाऱ्यांच्या ओव्हरटाईमवर खर्च केले आहेत. सूत्रांच्या म्हणण्यानुसार एस.टी.च्या इतिहासात ओव्हरटाईमवर प्रथमच एवढा मोठा खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे आता कमी मूळ वेतन (बेसिक) असलेल्यांनाच जादा कामाचा मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वाढत्या खर्चावर नियंत्रण मिळवून दैनंदिन उत्पन्नाचा ताळमेळ साधण्यासाठी यापुढे ओव्हरटाइम देताना ‘कमी मूळ वेतन’ असलेल्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने चालक आणि वाहकांच्या ओव्हरटाईम भत्त्याच्या नियमावलीत मोठे बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

प्रमाण कार्यपद्धती वापरण्याचे निर्देशओव्हरटाईमवरून होणाऱ्या आरोपांची परिवहन मंत्री तथा एस.टी.चे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दैनंदिन उत्पन्नवाढीबाबत नुकतीच आढावा बैठक घेतली. या बैठकीत ओव्हरटाइम भत्त्यावरील खर्चावर नियंत्रण नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आणण्यात आले होते. त्यानंतर ओव्हर टाईमसाठी प्रमाण कार्यपद्धती वापरली जावी, असे निर्देश सरनाईक यांनी दिले होते. आता त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. 

नवी मार्गदर्शक तत्त्वे कोणती?  आगारांनी चालक/वाहकांची ‘अ’, ‘ब’, ‘क’ अशी वर्गवारी करून नोंदवही ठेवावी. ओव्हरटाइमसाठी  ‘क’ गटातील कर्मचाऱ्यांचाच वापर व्हावा. जेणेकरून आर्थिक बोजा घटेलकर्मचाऱ्यांची कमतरता असल्यास ‘डबल ड्यूटी’चे नियोजन करून  ज्यांचे मूळ वेतन कमी आहे, त्यांनाच प्राधान्य द्यावे. ‘डबल ड्यूटी’चे वेळापत्रक १० दिवस आधीच लावावे. कर्मचाऱ्यांची साप्ताहीक सुट्टी कुठल्याही स्थितीत रद्द करू नये. तसे केल्यास पर्यवेक्षकावर कारवाई.

English
हिंदी सारांश
Web Title : ST spent ₹35 crore on overtime in just 30 days.

Web Summary : Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) spent ₹35 crore on overtime in October. To control costs, priority will be given to employees with lower basic salaries for overtime. New guidelines include classifying employees and prioritizing those with lower salaries for double duty, with schedules set 10 days in advance.
टॅग्स :state transportएसटीMumbaiमुंबई