शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

वस्त्रनगरीवर बालोत्रातील प्रोसेसर्स बंदचा परिणाम

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार असल्याने सरकारने मध्यस्थी करत याबाबत तोडगा काढावा, अशी मागणी

अतुल आंबी - इचलकरंजी -बालोत्रा (राजस्थान) येथे कापडावर प्रक्रिया करणारे प्रोसेसर्स बंद असल्याने इचलकरंजीतील उद्योजक हवालदिल झाले आहेत. दररोजचे ५० लाख मीटर उत्पादन होणारे कापड ठप्प झाले आहे. त्यामुळे करोडो रुपयांचे नुकसान येथील वस्त्रोद्योगाला सहन करावे लागत आहे. बालोत्रा येथे लहान-मोठे ७८० प्रोसेसर्स आहेत. त्यातील फक्त १० प्रोसेसर्स सुरू आहेत. उर्वरित सर्व प्रोसेसर्स प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईनंतर १५ मेपासून बंद आहेत. याबाबत एनजीटी न्यायालयात सुनावणी सुरू असून, तीन तारखा झाल्या आहेत. ३१ जुलैला पुढील सुनावणी होणार आहे. दरम्यान, बालोत्रा येथील बंदमुळे इचलकरंजी शहरातील सुमारे ६० हजार लूम्सवर दररोज उत्पादन होणारे ५० लाख मीटर कापड ठप्प झाले आहे. यामध्ये केंब्रिक, पॉपलीन, पीसी (पॉलिस्टर कॉटन) या क्वॉलिटींचा समावेश आहे. बंदच्या आधी उत्पादन झालेले लाखो मीटर कापड शहरातील गोडावूनमध्ये भाडेतत्त्वावर पडून आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे कापड खराब होण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.परिणामी, अडते, व्यापारी या कापडाचे पैसे कारखानदारांना देत नाहीत. कारखानदार यार्न व्यापाऱ्यांचे देणे बाकी आहेत. तर उत्पादन ठप्प झाल्याने कामगारांनाही काम नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे. या क्षेत्रातील सर्वच घटकांची यामुळे आर्थिक कुचंबना होत आहे. दरम्यान, राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार असल्याने सरकारने मध्यस्थी करत याबाबत तोडगा काढावा, अशी मागणी कारखानदार व व्यापाऱ्यांनी येथील आमदार सुरेश हाळवणकर यांच्याकडे केली आहे.वस्त्रोद्योगाची साखळी ब्लॉक झालीलाखो मीटर कापड गोडावूनमध्ये पडून असल्याने शहरातील अनेक गोडावून हाऊसफुल्ल झाली आहेत. या कापडाचा उठाव नसल्याने अडत्याने कारखानदारांचे पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे कारखानदारांनी यार्न, स्पेअर पार्ट, जॉबर, गोडावून भाडे यासह अवलंबून असलेल्या अन्य घटकांना त्यांचे पैसे दिलेले नाहीत. परिणामी, एकमेकांवर अवलंबून असलेली सर्वच साखळी ब्लॉक झाली आहे. यामुळे करोडो रुपयांची उलाढाल ठप्प आहे.३१ जुलैला ‘किमान वेतन’ची सुनावणीबालोत्रा येथे इचलकरंजीतील ८० टक्के कापडावर प्रक्रिया होत होतीपॉपलीन, केंब्रिक, पीसी क्वॉलिटींचा समावेशउत्पादन ठप्प