शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आमची भूमिका सहकार्याचीच : हिंदू जनजागृती समिती

By admin | Updated: July 24, 2015 00:53 IST

पुरातत्व खात्याकडे आणि श्रीपूजकांनाही मूर्ती बदलण्याची मागणी पत्राद्वारे केली होती; पण अडवणूक केलेली नाही.

कोल्हापूर : कोणत्याही देवतेची मूर्ती भंग पावली तर त्याजागी नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात यावी, असे शास्त्र सांगते ही भूमिका आम्ही पुरातत्व खात्याकडे मांडली होती. याचा अर्थ आम्ही अंबाबाई मूर्तीवर रासायनिक संवर्धन करू देणार नाही, असा नाही. पुरातत्व खात्याने कोणतीही चर्चा न करता परस्पर कोल्हापुरात न येण्याचा निर्णय का घेतला हे माहीत नाही; पण आमची भूमिका नेहमी सहकार्याचीच असणार आहे, असा खुलासा हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला. हिंदू जनजागृती समितीचे मधुकर नाझरे यांनी पुरातत्व खात्याला रासायनिक संवर्धनाच्या विरोधात पत्र पाठवल्यानंतर पुरातत्वच्या अधिकाऱ्यांनी श्रीपूजकांना बुधवारी अंबाबाई मूर्तीवर रासायनिक संवर्धन करण्यासाठी आम्ही कोल्हापुरात येऊ शकत नाही, असे दूरध्वनीवर कळविले होते. शिंदे म्हणाले, ‘निर्णयसिंधू’ आणि ‘प्रतिष्ठामोप्तीकम्’ या दोन ग्रंथांमध्ये देवतेची मूर्ती कधी बदलावी, याचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे पुरातत्व खात्याकडे आणि श्रीपूजकांनाही मूर्ती बदलण्याची मागणी पत्राद्वारे केली होती; पण अडवणूक केलेली नाही. तसे पत्रक जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.जिल्हाधिकारी घेणार आज बैठक या घटनेच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी देवस्थान समितीच्या सचिव शुभांगी साठे, सदस्या संगीता खाडे, प्रमोद पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी सैनी यांनी पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. पुरातत्व खात्याचे अधिकारी रासायनिक प्रक्रिया करण्यासाठी आले नाही तर आज, शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता देवस्थान समिती, श्रीपूजक व हिंदू जनजागृती समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रमोद पाटील यांनी दिली.