शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

MPSC Exam ...अन्यथा 'एमपीएससी'ची परीक्षा केंद्रे उध्दवस्त करु : मराठा क्रांती मोर्चाचा राज्य सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 14:35 IST

MPSC Exam : मराठा आरक्षणाविना एमपीएससीच्या परीक्षा लादण्याचा प्रयत्न करु नये. अन्यथा समाज भावना अत्यंत प्रक्षुब्ध आहेत..

ठळक मुद्देमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष तसेच पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाव्दारे एमपीएससी MPSC Exam येत्या ११ ऑक्टोबर व २२ नोव्हेंबर २०२० रोजी अनुक्रमे राजपत्रित व अराजपत्रिक (SIT,PSI,ASO) व इतर पदांसाठी परीक्षा घेण्यात येत आहेत. या परीक्षांच्या जाहिराती व अर्ज भरण्याची प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षणावरील स्थगिती पूर्वीची असून संबंधित अर्जामध्ये एसईबीसी अंतर्गत मराठा समाजाला जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. परंतु, न्यायालयाच्या आरक्षण स्थगितीच्या पार्श्वभूमीवर ' एमपीएससी'मधील एसईबीसीच्या आरक्षणावरील शासनाची भूमिका जाहीर न करताच परीक्षा घेण्याचा घाट घातला जात आहे. सरकारने मराठा आरक्षणाविना एमपीएससीच्या परीक्षा लादण्याचा प्रयत्न करु नये. अन्यथा केंद्रे उद्धवस्त करण्यात येतील, असा गंभीर इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या Maratha Kranti Morcha वतीने राज्य शासनाला देण्यात आहे.  

मुख्यमंत्री, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि पुणे जिल्हाधिकारी यांना या संबंधीचे निवेदन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आले आहे . या निवेदनावर मराठा कांती मोर्चाचे राज्य समन्वयक राहुल पोकळे, पुणे जिल्हा समन्वयक सतिश काळे, परमेश्वर जाधव, अमोल देशमुख यांच्या सह्या आहेत. 

या निवेदनात एमपीएससी MPSC च्या परीक्षा देणाऱ्यांमध्ये ग्रामीण भागातील मराठा गरीब विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असून या स्पर्धा परीक्षा त्यांच्या भवितव्यासाठी दृष्टीने मोठी संधी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षणावरील स्थगितीमुळे मराठा समाजातील तरुण संभ्रमित व अस्वस्थ आहे. अशा वातावरणात मराठा समाजाच्या आरक्षणाविना परीक्षा घेणे म्हणजे मराठा समाजाला त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्यासारखेच आहे.  शासनाकडून 'एमपीएससी' च्या परीक्षामधील एसईबीसीचे आरक्षण वटहुकूम काढून अबाधित ठेवूनच परीक्षा घेण्यात याव्यात. जोपर्यंत असा वटहुकूम जारी होत नाही तोपर्यंत 'एमपीएससी' च्या परीक्षा घेण्यात येवू नयेत. मराठा आरक्षणाविना एमपीएससीच्या परीक्षा लादण्याचा प्रयत्न करु नये. अन्यथा समाज भावना अत्यंत प्रक्षुब्ध आहेत. येत्या ११ आक्टोबर ला महाराष्ट्रातील एकाही परीक्षा केंद्रावर परीक्षा होऊ दिली जाणार नाही. मराठा समाजाच्या होणाऱ्या या उद्रेकाला सर्वस्वी राज्यशासन जबाबदार असेल याची गांभीर्याने दखल घ्यावी.   

टॅग्स :PuneपुणेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMPSC examएमपीएससी परीक्षा