'...नाहीतर वाल्मीक कराड महाराष्ट्राचा लॉरेन्स बिष्णोई होईल'; सुरेश धस धनंजय मुंडेंवरही भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 18:24 IST2025-01-06T18:19:56+5:302025-01-06T18:24:47+5:30

Suresh Dhas Dhananjay Munde News: धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. याच भेटीवर बोट ठेवत आमदार सुरेश धस यांनी राजीनाम्याची मागणी करत धनंजय मुंडेंवर संताप व्यक्त केला.  

'...Otherwise Valmik Karad will become Lawrence Bishnoi of Maharashtra'; Suresh Dhas also lashed out at Dhananjay Munde | '...नाहीतर वाल्मीक कराड महाराष्ट्राचा लॉरेन्स बिष्णोई होईल'; सुरेश धस धनंजय मुंडेंवरही भडकले

'...नाहीतर वाल्मीक कराड महाराष्ट्राचा लॉरेन्स बिष्णोई होईल'; सुरेश धस धनंजय मुंडेंवरही भडकले

Dhananjay Munde Maharashtra News: खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडबद्दल भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आज मोठे विधान केले. त्याचबरोबर अजित पवारांसोबत राजीनाम्याबद्दल कोणतीही चर्चा झाली नसल्याच्या धनंजय मुंडेंच्या विधानावरही त्यांनी संताप व्यक्त केला. यात धनंजय मुंडेंचं वाटोळ होणार नाही, तर अजित पवारांचं होईल, असा इशारा सुरेश धस यांनी दिला.  

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

एका मुलाखतीत बोलताना आमदार सुरेश धस यांनी वाल्मीक कराड, धनंजयम मुंडेंबद्दल भाष्य केले. या सगळ्यांना फाशी झाली पाहिजे अशी तुमची मागणी आहे? असा प्रश्न सुरेश धस यांना विचारण्यात आला होता. 

यांची राखच बाहेर निघाली पाहिजेत -सुरेश धस

सुरेश धस म्हणाले, "शंभर टक्के फाशी झाली पाहिजे. फाशीवर गेले पाहिजेत. यांचे जामीन नाही झाले पाहिजेत. यांची राखच बाहेर निघाली पाहिजे."

"हे जर आका आत गेले, तर परळीतील राखेचे चटके बसणे लवकरच बंद होतील, असं मला वाटतं. आका आतच राहिले तर बरं होईल. नाहीतर हे काही दिवसात महाराष्ट्राचे लॉरेन्स बिष्णोई होईल.  वाल्मीक अण्णा बिष्णोईचा भाऊ होऊ नये", असे सुरेश धस म्हणाले. 

अजित पवारांनी मुंडेंना आणखी एखादं खातं द्यावं -सुरेश धस

धनंजय मुंडेंनी अजित पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर धस यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. 

"त्यांना शुभेच्छा द्यायला गेले. किती वेळ कवटाळून शुभेच्छा देत होते, काय माहिती? अजित पवारांनी त्यांना मंत्री ठेवावं. आणखी एखादं मंत्रिपद द्यावं. त्यांच्याकडे वित्त व नियोजन आहे. नियोजन किंवा वित्त त्यांच्याकडे (धनंजय मुंडे) द्यावं. आमचं काही म्हणणं नाही."

स्वतःहून मंत्रि‍पदाचा राजीनामा द्या ना; धस काय बोलले?

"तुमची चर्चा कशावरही होऊद्या. तुम्ही ट्रायलची भाषा वापरता ना? ट्रायल होईपर्यंत तुम्ही जा ना पदावरून बाजूला. कशाला पदावर राहता चिकटून? द्या राजीनामा स्वतःहून. अजित पवारांवर सांगण्याची वेळ कशाला येऊ देता, तुम्ही राजीनामा द्या ना. याचं काही वाटोळ होणार नाही, अजित पवारांचं होणार आहे. आम्हाला काय करायचं. अजित पवारांकडे जे लोक वळले आहेत, ते पुन्हा शरद पवारांकडे जातील. नाहीतर नवीन नेता बघतील", असे टीकास्त्र सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर डागलं.

Web Title: '...Otherwise Valmik Karad will become Lawrence Bishnoi of Maharashtra'; Suresh Dhas also lashed out at Dhananjay Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.