शहरं
Join us  
Trending Stories
1
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
2
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
3
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
4
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
5
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
6
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
7
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
8
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
9
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
10
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
11
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
12
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
13
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
14
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
15
VIDEO : असा दबा धरून शिकार करतात सिंह, गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला अंगावर शहारा आणणारा थरार 
16
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
17
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
18
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
20
Video - हाहाकार! उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस अन् भीषण चक्रीवादळ; १०१ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

'ऑर्कुट' वी मिस यू..!

By admin | Updated: July 4, 2014 09:22 IST

गुगलने ऑर्कुट बंद करण्याचा निर्णय घेतला. याच धर्तीवर अखेरची 'ऑर्कुटवारी' करण्याचे आवाहन मूड इंडिगोच्या टीमने फेसबुकवर केले आहे.

तरुणाईची भावना : मूड इंडिगोच्या टीमची 'आयडिया'

मुंबई : फेसबुक, व्हॉट्सअँप, चॅटऑन, व्ही चॅट, गुगल हँगआऊट, ट्विटर अशा डझनभर सोशल मेसेंजरमध्ये प्रत्येक जण 'बिझी' असतो. मात्र कित्येक वर्षांपूर्वी 'ऑर्कुट'ने सोशल नेटवर्किंग मेसेजिंगमध्ये स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले होते. ऑर्कुटमध्ये स्क्रॅप पाठविणे, स्टेटस ठेवणे, फोटोज् ही मजा वेगळीच होती. पण आता गुगलने ऑर्कुट बंद करण्याचा निर्णय घेतला. याच धर्तीवर अखेरची 'ऑर्कुटवारी' करण्याचे आवाहन मूड इंडिगोच्या टीमने फेसबुकवर केले आहे.
'ऑर्कुट'ने सर्वांत आधी यंगस्टर्सला भुरळ घातली. ऑर्कुटमधील टेस्टीमॉनिअल, कम्युनिटीज्, स्टेटस, फ्रेंड रिक्वेस्ट, स्क्रॅपबुक या सगळ्यात तरुणाई रमलेली असायची. याचीच आठवण पुन्हा एकदा करून देण्यासाठी मूड इंडिगोच्या टीमने फेसबुकवर शेवटच्या 'ऑर्कुट' भेटीची कल्पना मांडली आहे. या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा मिळेल, शिवाय 'बोअर' झालेल्या फेसबुक आणि व्हॉट्सअँपच्या गर्दीतून चेंज मिळेल, असे या टीमचे म्हणणे आहे.
ऑर्कुटच्या जुन्याच अकाउंटमधील काही 'हटके' स्क्रॅप्स आणि फोटोज् पुन्हा मूड इंडिगोच्या फेसबुक पेजवर शेअर करण्याचे आवाहन या टीमने केले होते. त्यातून ७२ तासांदरम्यान येणार्‍या फोटोज् आणि स्क्रॅप्समधून काही विजेते निवडणार आहेत. त्यांना मूड इंडिगोच्या टीमकडून पारितोषिकही देण्यात येणार आहे. या आयडियाची कॉलेजिअन्समध्ये चर्चा आहे. कित्येक वर्षांपूर्वी दुरावलेल्या या 'ऑर्कुट' अकाउंटचा पासवर्ड किती जणांच्या लक्षात आहे, ही वेगळीच परीक्षा आहे. 'ऑर्कुट' बंद होत असताना सर्वांच्याच मनात 'वी रिअली मिस यू' अशाच काहीशा भावना आहेत. (प्रतिनिधी)