शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरापासून अवयव प्रत्यारोपणाचा टक्का वाढला

By admin | Updated: August 24, 2016 02:35 IST

यंदा साडेसात महिन्यांतच अवयवदानाचा आकडा हा ४१वर पोहोचला आहे.

मुंबई : यंदा साडेसात महिन्यांतच अवयवदानाचा आकडा हा ४१वर पोहोचला आहे. शनिवारी रात्री झालेल्या अवयवदानामुळे एकाला जीवनदान मिळाले आहे. व्यक्तीचा मेंदू मृतावस्थेत गेल्यास त्या व्यक्तीचे अवयव दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रत्यारोपित करणे शक्य असते. याविषयी गेल्या काही वर्षांपासून महापालिका आणि राज्य सरकार जनजागृती करीत आहे. गेल्या तीन वर्षांत या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.अवयवदानासाठी जनजागृती मोहिमेला यश आल्याचे चित्र गेल्या तीन वर्षांत दिसत आहे. गेल्या वर्षी एकूण ४२ जणांनी अवयवदान केले होते. यंदा आॅगस्ट महिन्यापर्यंतच ४१ जणांनी अवयवदान केले आहे. त्यामुळे पुढच्या काही महिन्यांत अजून अवयवदान होऊन आत्तापर्यंत सर्वाधिक अवयवदान या वर्षांत होईल अशी आशा मुंबईच्या विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीने व्यक्त केली आहे. अवयवांच्या प्रत्यारोपणाची प्रतीक्षा यादी मोठी आहे. पण, त्या प्रमाणात अवयवदान होत नाही. नानावटी रुग्णालयात शनिवारी एका महिलेचे मूत्रपिंड दान केल्यामुळे एका व्यक्तीला जीवनदान मिळाले आहे. गुरुवारी मालाड येथे ५५ वर्षीय महिलेला नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या महिलेला ब्रेन हॅमरेज झाले होते. उपचारादरम्यान या महिलेचा मेंदू मृतावस्थेत गेला. त्यानंतर तिच्या नातेवाइकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. एक मूत्रपिंड दान करण्यात आले. (प्रतिनिधी)