शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

डीएमईआरकडून आदेशांची पायमल्ली

By admin | Updated: April 8, 2015 01:56 IST

पॅथॉलॉजी लॅब चालवण्यास कोणास परवानगी आहे आणि कोणास परवानगी नाही, याविषयी १० आॅक्टोबर २००७ रोजी उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश दिले

पूजा दामले, मुंबईपॅथॉलॉजी लॅब चालवण्यास कोणास परवानगी आहे आणि कोणास परवानगी नाही, याविषयी १० आॅक्टोबर २००७ रोजी उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश दिले. त्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आलेल्या आदेशांची वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय (डीएमईआर) सर्रास पायमल्ली करीत आहे.न्यायालयाच्या आदेशात स्पष्टपणे लिहिले आहे, की डीएमएलटी आणि तत्सम शिक्षणधारक पॅथॉलॉजी लॅब चालवत असल्यास त्यांच्यावर कारवाई करावी. न्यायालयाच्या आदेशाचे सोईनुसार अर्थ काढून डीएमईआरकडून कारवाईत दिरंगाई केली जात आहे. डीएमईआर कार्यालयातून निर्गमित झालेल्या एकाच पत्रात स्वतंत्ररीत्या लॅब चालवणाऱ्या डीएमएलटीधारकांवर कारवाई करा आणि त्याच पत्रात खालच्या उताऱ्यात कारवाई करू नका, असे विरोधाभास निर्माण करणारे आदेश देण्यात आले आहेत. डीएमएलटी आणि तत्सम प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्ती स्वतंत्रपणे पॅथॉलॉजी लॅब चालवत असल्यास त्यांच्यावर बोगस डॉक्टरवर ज्या कायद्यांतर्गत कारवाई होते, त्याद्वारेच कारवाई होते, असे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे म्हणणे आहे. परंतु डीएमईआरचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांच्या म्हणण्यानुसार, डीएमएलटी अथवा तत्सम शिक्षण घेतलेल्या व्यक्ती मशिनद्वारे आलेला रिपोर्ट रुग्णाला देऊ शकतात. नवीन तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे अनेक तपासण्यांचे रिपोर्ट मशिनद्वारे येतात. त्यामुळे हिमोग्लोबिनची तपासणी केल्यावर हिमोग्लोबिन ६ अथवा ७ आल्यास तो रिपोर्ट देऊ शकतो. पण त्यावर अ‍ॅनिमिया असे नमूद करू शकत नाही. मशिनमधून येणारे रिपोर्ट देण्यास परवानगी असल्याचा निष्कर्ष डॉ. शिनगारे यांनी काढला आहे.