अनिल देशमुख हाजीर हो..!; १६ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 05:55 IST2021-10-02T05:55:35+5:302021-10-02T05:55:58+5:30

प्रथमदर्शनी त्यांच्याविरुद्ध केस होत आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

Order to appear in court on November 16 former maharashtra minister Anil Deshmukh pdc | अनिल देशमुख हाजीर हो..!; १६ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

अनिल देशमुख हाजीर हो..!; १६ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

ठळक मुद्देप्रथमदर्शनी त्यांच्याविरुद्ध केस होत आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

मुंबई : मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीने बजावलेल्या समन्सकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात आले, असे निरीक्षण नोंदवत अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १६ नोव्हेंबर रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले.

मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीपुढे चौकशीला हजर न राहिल्याने अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी देशमुख यांच्याविरोधात शुक्रवारी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.  भारतीय दंडसंहिता १७४ अंतर्गत न्यायालयाने देशमुख यांच्यावर ही कारवाई सुरू केली आहे. ईडीने देशमुख यांच्याविरोधात केलेल्या अर्जावर न्यायदंडाधिकारी आर. एम. नेर्लीकर यांच्यापुढे सुनावणी होती.

ईडीने बजावलेले समन्स आरोपी, त्यांची मुलगी किंवा त्यांच्या वतीने वकिलांनी घेतले. प्रथमदर्शनी त्यांच्याविरुद्ध केस होत आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

Web Title: Order to appear in court on November 16 former maharashtra minister Anil Deshmukh pdc