शहरं
Join us  
Trending Stories
1
'भटकती आत्मा' म्हणत मोदींचा हल्लाबोल; अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी...
2
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
3
देवेंद्र यादव दिल्ली काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली नियुक्ती
4
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल
5
Rahul Gandhi : "जेव्हा सकाळी उठतील तेव्हा जादुने महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये 1 लाख येतील..."
6
मी नवखा उमेदवार नाही, माझं काम हा माझा ब्रँड; रवींद्र वायकर यांची पहिली प्रतिक्रिया
7
T20 World Cup 2024: विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघाची घोषणा! घातक गोलंदाजाची अखेर एन्ट्री
8
... मग मोदी टीका करणारच; भटकत्या आत्म्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
9
T20 World Cup संघ निवडीच्या हालचालींना वेग: जय शाह, अजित आगरकर यांच्यात बैठक
10
T20 World Cup साठी दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ; टेम्बा बवुमाला डच्चू!
11
“मुंबईत कामे केली आहेत, सर्व जागा महायुती नक्की जिंकेल”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
12
अमित शहा फेक व्हिडिओ प्रकण; काँग्रेस आ. जिग्नेश मेवाणीचा PA आणि एका AAP नेत्याला अटक
13
बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
14
सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं
15
IPL 2024 MI vs LSG: Mumbai Indians च्या संघात केला जाणार महत्त्वाचा बदल? 'या' स्टार खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता
16
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
17
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
18
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
19
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
20
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?

डिसेंबर आला तरी पावसाळा जाईना, अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आज ऑरेंज अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2021 11:03 AM

Rain In Maharashtra : दक्षिण - पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्विपमधील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुन्हा एकदा हवामानात उल्लेखनीय बदल झाले आहेत. या हवामान बदलामुळे २ डिसेंबरपर्यंत राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

 मुंबई : दक्षिण - पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्विपमधील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुन्हा एकदा हवामानात उल्लेखनीय बदल झाले आहेत. या हवामान बदलामुळे २ डिसेंबरपर्यंत राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विशेषत: १ डिसेंबर रोजी पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, मुंबई परिसरातदेखील पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.

असा आहे अंदाज१ डिसेंबर : पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतही पावसाची शक्यता आहे. शिवाय कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, जालना या जिल्ह्यांसाठीही पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम कोकण आणि मध्य महाराष्ट्रावर जाणवेल. उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे.    - शुभांगी भुते, शास्त्रज्ञ, मुंबई     प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र