शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आमदार पास्कल धनारेंचा बुलेट ट्रेनला विरोध

By admin | Updated: June 27, 2017 02:59 IST

बुलेटट्रेन प्रकल्पासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी देण्यास भाजपाचेच आमदार पास्कल धनारे यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

सुरेश काटे। लोकमत न्यूज नेटवर्कतलासरी : बुलेटट्रेन प्रकल्पासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी देण्यास भाजपाचेच आमदार पास्कल धनारे यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. केंद्रशासित दादरा नगर हवेली व गुजरात राज्याच्या सीमांना भिडलेल्या आदिवासी बहुल तलासरी तालुक्यातून आता पर्यंत रिलायन्स गॅस लाईन, सहा पदरी महामार्ग, समुद्री मार्ग, सुपर एक्स्प्रेस हायवे, उच्च दाबाच्या विद्युतवाहिन्या साकारल्या. या सर्वांसाठी आदिवासींच्या जमिनी मातीमोल भावाने घेण्यात आल्या आहेत, आणि आता पंतप्रधान मोदी यांनी बुलेट ट्रेन हा महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून त्या साठी शेतकऱ्याच्या जमिनी ताब्यात घेण्यासाठी सर्व्हे सुरू आहे डहाणू विधानसभा मतदार संघाचे आमदार पास्कल धनारे यांनी आपल्याच सरकारच्या विरोधात दंड थोपटले असून बुलेट ट्रेनला विरोध दर्शविला आहे आणि त्यांच्या या विरोधाला तलासरी भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीने देखील पाठींबा दिला आहे. शेतकऱ्याची बाजू घेऊन आपल्याच सरकारच्या विरोधात पाऊल उचलल्याने आदिवासी शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. अनेक प्रकल्पासाठी तलासरी तालुक्यातील आदिवासींच्या जमिनी घेऊन त्याला भूमिहीन केले आहे अन आता बुलेट ट्रेन साठीही आदिवासी शेतकर्याची जमीन घेऊन त्याला देशोधडीला लावणार असाल तर अशा प्रकल्पाची गरजच काय आहे, आदिवासींना उध्वस्त करून सरकार कोणाचा विकास करू पाहते आहे अशी संतप्त प्रतिक्रियाही पास्कल धनारे यांनी व्यक्त केली आहे. पक्षाचे तालुका अध्यक्ष विनोद मेढा, पक्षाचे नेते लक्ष्मण वरखंडे, लुईस काकड, सुरेंद्र निकुंभ, यांनीही बुलेट ट्रेनला विरोध करून आदिवासी शेतकऱ्याच्या बाजूने आंदोलनात उतरण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे.