शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

हिंदूत्व व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विरोध करणारच - ओवेसी

By admin | Updated: April 7, 2015 16:17 IST

हिंदूत्व व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नेहमीच विरोध करीन असे विधान असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ७ - मी हिंदूंच्या विरोधात नसून हिंदूत्वाच्या विरोधात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची हिंदूत्ववादी विचारधारा देशासाठी घातक असून शेवटच्या श्वासापर्यंत मी याला विरोधच करणार असे प्रतिपादन एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी केले. मुस्लीम तरुणांनी इसिससारख्या दहशतवादी संघटनांकडे जाण्याऐवजी राजकारणात येऊन न्यायासाठी लढा द्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी मंगळवारी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांचे रोखठोक मतं मांडली. ओवेसी म्हणाले, मी एक सच्चा भारतीय असून आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो. आम्ही हिंदूविरोधी नाही तर हिंदूत्वाच्या विरोधात आहोत. एमआयएम व भाजपा एकत्र असल्याच्या आरोपांचांही ओवेसी यांनी समाचार घेतला. एमआयएमने सात वर्ष यूपीएला पाठिंबा दिला होता. आता त्यांना पाठिंबा दिला तर मी भाजपाच्या सोबत गेलो असा आरोप होतेय याकडेही त्यांनी लक्ष वेधले.  आम्ही रझाकार व जिनांना मानत नाही. माझ्या पूर्वजांचे भारतमातेशी प्रेम होते. म्हणूनच आम्ही भारतात थांबलो अशी आठवणही त्यांनी करुन दिली. मी धर्मनिरेपक्ष असल्याचे काँग्रेसकडून व राष्ट्रप्रेमी असल्याचे शिवसेना - भाजपाकडून प्रमाणपत्रं घेऊ का असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला. भारताचे भले झाल्यास मुसलमानांचेही भले होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.