शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

विरोधक प्रभावशून्य

By admin | Updated: July 25, 2015 01:36 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रशासनावर पकड नाही. तलाठ्यापासून मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंत भ्रष्टाचार सुरू असून, भ्रष्ट मंत्र्यांची

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रशासनावर पकड नाही. तलाठ्यापासून मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंत भ्रष्टाचार सुरू असून, भ्रष्ट मंत्र्यांची पाठराखण करणाऱ्या फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी माजी मंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. अजित पवार व छगन भुजबळ सोडले तर विरोधकांची भाषणे प्रभावशून्य असल्याचा घरचा अहेरही राणे यांनी दिला आहे.राणे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचा प्रस्ताव फेटाळला. मात्र यापूर्वीची कर्जमाफी ही भाजपाच्या मागणीनुसार झाली होती. केंद्र सरकार महाराष्ट्राचे महत्त्व कमी करत असताना फडणवीस मूग गिळून बसले आहेत. भ्रष्टाचार बोकाळला असून, आठ महिन्यांत जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्रिपदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे.उद्धव ठाकरे व शिवसेनेच्या मुखपत्रातून होणाऱ्या टीकेमुळे केवळ लोकांची करमणूक होत असल्याचा टोला लगावून राणे म्हणाले की, भाजपा उद्धव ठाकरे यांची दिशाभूल करत आहे. भाजपाने ठाकरे यांच्या अनेक मुद्द्यांना बगल देऊनही लाचारीने ते सत्तेत बसले आहेत. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर ते सत्तेत राहिले नसते. रामदास कदम यांनी पर्यावरण या शब्दाचा अचूक अर्थ सांगितला तर मी वाट्टेल ते हरेन, असा चिमटा राणे यांनी त्यांना काढला. (विशेष प्रतिनिधी)