Opinion Poll: ...तर शिवसेनेला लोकसभेत केवळ ५ जागा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 06:41 IST2018-11-02T04:19:42+5:302018-11-02T06:41:56+5:30
लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रात सर्व पक्ष वेगळे लढले तरी आजच्या परिस्थितीत भाजपा २३ जागांसह पहिल्या क्रमांकावर राहील तर शिवसेनेला केवळ पाच जागा मिळतील, असा निष्कर्ष एबीपी माझा-सी व्होटरच्या आॅक्टोबरमधील सर्वेक्षणातून समोर आला आहे.

Opinion Poll: ...तर शिवसेनेला लोकसभेत केवळ ५ जागा
मुंबई : लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रात सर्व पक्ष वेगळे लढले तरी आजच्या परिस्थितीत भाजपा २३ जागांसह पहिल्या क्रमांकावर राहील तर शिवसेनेला केवळ पाच जागा मिळतील, असा निष्कर्ष एबीपी माझा-सी व्होटरच्या आॅक्टोबरमधील सर्वेक्षणातून समोर आला आहे. केंद्रात पुन्हा एकदा एनडीएचीच सत्ता येईल, असे त्यात म्हटले आहे.
एनडीएला ३००, काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीएला ११६ तर इतर पक्षांना १२७ जागा मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपासोबत युती केली तर एनडीएला पहिल्या क्रमांकाच्या ३४ जागा मिळतील. तर यूपीएला १४ जागांवर झेंडा फडकवता येईल. सर्व पक्ष वेगळे लढले तर भाजपा आणि मित्रपक्षांना २३ जागा, काँग्रेस आणि मित्र पक्षांना १४ जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला ६ जागा तर शिवसेनेला ५ जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वेगळे लढल्याचा मोठा फटका शिवसेनेला बसेल.
राज्यातील सर्वात सक्षम नेता म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना १९.३ टक्के मतदारांनी कौल दिला तर शरद पवार यांना १८.७ टक्के आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ११.८ टक्के मतदारांनी पसंती दर्शवली आहे.