शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
4
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
5
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
6
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
7
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
8
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
9
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
10
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
11
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
12
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
13
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
14
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
15
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
16
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
17
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
18
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
19
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
20
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याला फक्त ७ टीएमसी पाणी

By admin | Updated: March 24, 2015 01:20 IST

मराठवाड्याला हक्काचे २१ टीएमसी पाणी मिळणार, या दिवास्वप्नात असलेल्या जनतेच्या पदरी घोर निराशा येणार आहे. कारण फक्त ७ टीएमसी पाणी उपलब्ध होणार

अतुल कुलकर्णी ल्ल मुंबईमराठवाड्याला हक्काचे २१ टीएमसी पाणी मिळणार, या दिवास्वप्नात असलेल्या जनतेच्या पदरी घोर निराशा येणार आहे. कारण फक्त ७ टीएमसी पाणी उपलब्ध होणार असून, त्या अनुषंगानेच कामे हाती घेण्यात आल्याची माहिती विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून समोर आली आहे.कृष्णा खोऱ्याचा १० टक्के भूभाग मराठवाड्यात येतो. त्यानुसार कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाद्वारे उजनी जलाशयात येणाऱ्या ६६.२७ टीएमसी पाण्यापैकी २१ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय तात्कालिक मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी औरंगाबादेत झालेल्या बैठकीत २२ फेब्रुवारी रोजी घेतला होता. यातले १९ टीएमसी पाणी उस्मानाबादला आणि २ टीएमसी पाणी बीडला मिळणार होते. त्यानुसार २३ आॅगस्ट २००७ रोजी २३८२.५० कोटी रुपये खर्चाच्या कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पास मूळ प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. सिना कोळेगाव प्रकल्पातून मिळणारे पाण्याचे प्रमाण निश्चित झाले आणि एकूण २३.६६ टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळणार हे स्पष्ट झाल्यानंतर कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या सुधारित जल नियोजनास मान्यता देण्यात आली. त्यासाठी ४८४५.०५ कोटी रकमेसही मान्यता दिली गेली.मात्र पुन्हा एक गट सक्रिय झाला आणि ७ टीएमसी पाणी वापरासाठीचे काम २३४९.१० कोटीपर्यंत मर्यादित ठेवले गेले. दुसऱ्या टप्प्यात १६.६६ टीएमसी पाण्याची कामे हाती घेताना पुन्हा सुधारित प्रशासकीय मान्यता घेण्याची अट टाकली गेली. यासाठी कृष्णा पाणी तंटा लवादाच्या निर्णयाचे कारण पुढे केले गेले आणि आता आंध्रातील गोदावरी खोऱ्यातील पोलावरम प्रकल्पाच्या अनुषंगाने कृष्णा खोऱ्यात उपलब्ध झालेल्या १४ टीएमसी पाण्यापैकी ७ टीएमसी पाणी मराठवाड्याला दिले जाणार आहे. यासाठी आजवर ६२३.१७ कोटी रुपये खर्ची पडले आहेत. २०१४-१५ या वर्षात यासाठी १२५ कोटी निधी दिला गेला होता त्यापैकी ६४.०२ कोटी रुपये खर्च झाल्यावर या प्रकल्पासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची मान्यता नाही असे सांगून हे काम थांबवले गेले आहे. ही मान्यता महिन्या दीड महिन्यात मिळवू, प्र्रकाश जावडेकर हे या खात्याचे मंत्री आहेत असे सांगून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत मराठवाड्यातल्या आमदारांचे सोमवारी कोरडे सांत्वन केले.सिंचनविषयक विशेष चौकशी समितीच्या अहवालात नमूद केलेल्या १६ दोषयुक्त प्रकल्पांमध्ये कृष्णा मराठवाडा प्रकल्पाचा समावेश आहे. त्यामुळे राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीमार्फत तपासणी व फेररचना होण्यासाठी पाठविण्यात आलेल्या कामांच्या यादीत या प्रकल्पाचा समावेश आहे. शिवाय या प्रकल्पाची कामे आहे त्या स्थितीत संस्थगित ठेवण्यात आली असून, पर्यावरण विभागाची मान्यता मिळाल्याशिवाय कामे पुढे होणार नाहीत.