शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

शहरात सीएनजीवरील वाहने फक्त ६८ हजार..!

By admin | Updated: August 1, 2016 01:14 IST

सीएनजी वाहनांची संख्या वाढविण्यावर भर दिला जात असताना शहरात सध्या सीएनजीवर चालणारी केवळ ६८ हजार वाहने असल्याचे स्पष्ट झाले

पुणे : शहरातील हवेचा दर्जा सुधारावा यासाठी सीएनजी वाहनांची संख्या वाढविण्यावर भर दिला जात असताना शहरात सध्या सीएनजीवर चालणारी केवळ ६८ हजार वाहने असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच वेळी शहरातील एकूण वाहनांची संख्या ३१ लाखांवर पोहोचली असून, त्यामध्ये सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे दुचाकी वाहनांनी २३ लाखांचा टप्पा पार केला आहे.महापालिकेच्या वतीने शुक्रवारी २०१५-१६ चा पर्यावरण अहवाल प्रकाशित करण्यात आला. शहरातील हवा, पाणी, मृदा यांचे होणारे प्रदूषण, त्याचा मानवी जीवनावर आणि शहरांवर होणारा परिणाम, त्याची कारणे व ते रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना आदींचा आढावा घेण्यासाठी हा अहवाल प्रकाशित केला जातो. शहराचा वेगाने विकास होत असताना पर्यावरणाची कमीत कमी हानी कशी होईल याकडे लक्ष वेधण्याचे काम अहवालाद्वारे केले जाते. शहरातील हवेचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी जगभर सीएनजी वाहनांवर भर दिला जात आहे. दिल्लीच्या हवेतील प्रदूषणाची पातळी खालावल्याने तिथे अनेक ठिकाणी सीएनजी वाहने बंधनकारक करण्यात आली आहेत. पेट्रोल, डिझेल आदी इंधनावरील वाहनांच्या धुरामधून मोठ्या प्रमाणात कार्बन मोनाक्साइड बाहेर पडते, त्यामुळे हवेची पातळी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होते. ते रोखण्यासाठी सीएनजी वाहनांचा पाठपुरावा केला जात आहे. पेट्रोल, डिझेलवरील रिक्षांनी सीएनजी किट बसवून घ्यावे यासाठी महापालिकेच्या वतीने १२ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. मात्र, शहरातील ३० लाख वाहनांपैकी केवळ ६८ हजार ७८४ वाहने सीएनजीवर चालत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामध्ये तीनचाकी ३० हजार ६७०, चार चाकी ३६ हजार ८८८, पीएमपीच्या १ हजार २२६ वाहनांचा समावेश आहे. शहरातील एकूण वाहनांच्या तुलनेत ही संख्या खूपच तोकडी आहे.(प्रतिनिधी)।शहरामध्ये मागील वर्षी दुचाकींची संख्या २१ लाख ५२ हजार इतकी नोंदविण्यात आली होती, त्यामध्ये दोन लाखांची वाढ होऊन ती २३ लाख ३१ हजार इतकी झाली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने दिवसेंदिवस दुचाकींची वाढत असलेली संख्या शहराच्या वाहतूक व्यवस्था व पर्यावरणाच्या दृष्टीने चिंताजनक आहे. स्वत:ची कार खरेदी करणाऱ्यांची संख्याही वेगाने वाढत असून, कार, जीपची संख्या एक लाखांच्या घरात पोहोचली आहे. मागील वर्षी २८ लाख ७० हजार वाहनांची संख्या नोंदविण्यात आली होती. त्यामध्ये वाढ होऊन एकूण वाहनांची संख्या ३१ लाख ७ हजार ९६२ झाली आहे.