शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

केवळ १० टक्के टोलमुक्ती!

By admin | Updated: April 11, 2015 04:10 IST

राज्यातील १२ टोलनाके कायमस्वरूपी बंद, तर ५३ टोलनाक्यांवर कार, जीप आणि एसटी बसेस टोलमुक्त करण्यात येत आहेत, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली

मुंबई : राज्यातील १२ टोलनाके कायमस्वरूपी बंद, तर ५३ टोलनाक्यांवर कार, जीप आणि एसटी बसेस टोलमुक्त करण्यात येत आहेत, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या ३१ मेच्या मध्यरात्री १२ वाजल्यापासून करण्यात येणार आहे. मात्र, मुंबई आणि कोल्हापुरातील बहुचर्चित नाक्यांबाबतचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला. राज्यात सध्या एकूण १२० टोलनाके असून, त्यापैकी फक्त १२ टोलनाके बंद करण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील ४० नाक्यांवरील टोलचा निर्णय केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे.टोलमुक्त महाराष्ट्राची घोषणा करत सत्तेवर आलेल्या भाजपा-शिवसेना सरकारने आश्वासनाची पूर्तता अवघ्या पाच महिन्यांत केली, असे मुख्यमंत्री म्हणाले. टोलमुक्त नाक्यांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राज्य रस्ते विकास महामंडळ या दोन्हींच्या नाक्यांचा समावेश आहे. त्यात बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वावर उभारण्यात आलेल्या प्रकल्पांच्या मोबदल्याची रक्कम ही टोल कंत्राटदारासोबत केलेल्या करारनाम्यातील अटी व शर्तींनुसार राज्य शासनाच्या तिजोरीतून देण्यात येणार आहे. कायमस्वरूपी बंद करण्यात आलेल्या नाक्यांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे ११ आणि रस्ते महामंडळाच्या अखत्यारीतील १ नाका आहे. तर कार, जीप आणि एसटी बसेसना टोलमुक्ती मिळालेले बांधकाम विभागाचे २७ तर महामंडळाचे २६ नाके आहेत. (विशेष प्रतिनिधी)