राज्यातील शिक्षक पतसंस्था, बँकांना ऑनलाईन वार्षिक सभेचा पर्याय?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 07:53 PM2020-06-30T19:53:25+5:302020-06-30T19:54:00+5:30

दरवर्षी सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा जून ते सप्टेंबर महिन्यात होतात. यावर्षी कोरोना आजारामुळे राज्यभर वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास अडचणी आहेत.

Online credit meeting option for teachers' credit unions and banks in the state? | राज्यातील शिक्षक पतसंस्था, बँकांना ऑनलाईन वार्षिक सभेचा पर्याय?

राज्यातील शिक्षक पतसंस्था, बँकांना ऑनलाईन वार्षिक सभेचा पर्याय?

Next
ठळक मुद्देसहकार विभागाकडून  मागितली परवानगी

बारामती : कोरोनाच्या संकटामुळे सध्या  राज्यातील शिक्षक पतसंस्था, बँकांना आॅनलाईन वार्षिक सभेचा पर्याय आहे. कोरोना आजारामुळे वार्षिक सभा होत नसल्याचे चित्र आहे. त्यासाठी राज्यातील शिक्षक पतसंस्था व बँकांना आॅनलाईन वार्षिक सभेस सहकार विभागाकडून परवानगी देण्यात यावी, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली असल्याची माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली.
 दरवर्षी सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा जून ते सप्टेंबर महिन्यात होत असतात, यावर्षी कोरोना आजारामुळे राज्यभर वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास अडचणी आहेत. लाभांश वाटपासाठी संस्थेच्या वार्षिक सभेची मंजुरी आवश्यक असल्याने सामाजिक अंतर राखून अथवा ऑनलाइन वार्षिक सभेसाठी परवानगी देण्याची मागणी शिक्षक संघाने पालकमंत्री पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.  यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे, शिक्षक नेते हनुमंत जगताप, गेनबा आगवणे, देविदास ढोले, तानाजी भोसले, आदी पदाधिकारी उपस्थित होते
वार्षिक सर्वसाधारण सभेस परवानगी मिळत नसल्यास या वषार्पुरते लाभांश वाटपाचे अधिकार संचालक मंडळास देण्याचीही मागणी अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. पगारदार कर्मचाºयांच्या पतसंस्था नियमित वसुलीमुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात लाभांश वाटप करीत असतात, यावर्षी सहकार विभागाकडून वार्षिक सभेसाठी त्वरित मार्गदर्शन मिळावे ,अशी कर्मचाºयांची मागणी आहे.
———————————

Web Title: Online credit meeting option for teachers' credit unions and banks in the state?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.