खरिपाच्या एकतृतीयांश पीकक्षेत्राचा उतरविला विमा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2019 10:40 AM2019-08-03T10:40:20+5:302019-08-03T10:45:43+5:30

प्रधानमंत्री पीक विमा योजनेमधे अधिकाधिक शेतकऱ्यांना सहभागी होता यावे, यासाठी राज्य सरकारने विम्याची मुदत २४ जुलैवरून ३१ जुलैपर्यंत वाढविली होती.

One-third percent insurance got of crops in the state | खरिपाच्या एकतृतीयांश पीकक्षेत्राचा उतरविला विमा

खरिपाच्या एकतृतीयांश पीकक्षेत्राचा उतरविला विमा

googlenewsNext
ठळक मुद्दे१ कोटीहून अधिक अर्ज : मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा ७२ टक्के वाटामराठवाड्यात अजूनही समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकऱ्यांनी पीक विमा घेणे केले पसंत

पुणे : पीक विमा रकमेच्या परताव्यावरून उडालेले राजकीय रणकंदन, मराठवाडा व विदर्भातील पावसाचा घसरलेला टक्का, निसर्गाचे बदलत असलेले चक्र या पार्श्वभूमीवर यंदा पीक विम्यासाठी तब्बल १ कोटी ७ लाख ६२ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. त्यातील तब्बल ७२ टक्के अर्ज मराठवाड्यातील आहेत. या सर्व शेतकऱ्यांनी खरिपाच्या एकतृतीयांश क्षेत्रावरील पिकांना विम्याचे संरक्षण घेतले आहे. 
मराठवाडा गेली काही वर्षे सातत्याने दुष्काळाला सामोरा जात आहे. पावसाळ््याचे दोन महिने संपले तरी मराठवाड्यात क्षमतेच्या अवघा तीन टक्के पाणीसाठा धरणात आहे. नागपूर विभागातही केवळ २४ व अमरावती विभागात ३४ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे साहजिकच मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज केले आहेत. 
प्रधानमंत्री पीक विमा योजनेमधे अधिकाधिक शेतकऱ्यांना सहभागी होता यावे, यासाठी राज्य सरकारने विम्याची मुदत २४ जुलैवरून ३१ जुलैपर्यंत वाढविली होती. पीक विमा योजनेसाठी विमा कंपन्यांना द्याव्या लागणाऱ्यां शुल्कातील काही वाटा शेतकरी, तर उर्वरित भाग केंद्र व राज्य सरकार उचलते. जून महिन्यात पावसाने चांगलीच ओढ दिली होती. मराठवाड्यात अजूनही समाधानकारक पाऊस नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक विमा घेणे पसंत केले आहे. 
खरिपाचे सरासरी क्षेत्र दीड कोटी हेक्टर आहे. त्यापैकी तब्बल ५३ लाख ७८ हजार ६८१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा शेतकऱ्यांनी उतरविला आहे. गत खरीप हंगामात (२०१८) राज्यातील ८५ लाख ६ हजार ८२८ शेतकऱ्यांनी ४९ लाख २० हजार ३९१ हेक्टरवरील पिकांचा विमा उतरविला होता. यंदा शेतकऱ्यांची संख्या १ कोटी सात लाख ६२ हजार ३२५ झाली आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांची संख्या तब्बल ७८ लाख ४८ हजार २८८ इतकी आहे. खालोखाल पुणे विभागातील ११ लाख २७ हजार ४३५ व अमरावती विभागातील १० लाख ५४ हजार 
८०९ शेतकरी विमा योजनेत सहभागी झाले आहेत. 
.
१८ हजार कोटींचे विमा संरक्षण मिळणार

शेतकऱ्यांनी ५३ लाख ७८ हजार ६८१ हेक्टर क्षेत्राचा विमा उतरविला असून, त्यापोटी शेतकऱ्यांनी ४५० कोटी ५ लाख ६३ हजार ४३३ रुपये भरले आहेत. राज्य आणि केंद्र सरकारने विमा हप्त्यापोटी प्रत्येकी १५९९ कोटी रुपये अनुदान म्हणून दिले आहे. यातून तब्बल १८ हजार १०३ कोटी २६ लाख ७९ हजार रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. 
..........
विभागनिहाय सहभागी शेतकरी 
    (पीक क्षेत्र हेक्टरमध्ये/रक्कम रुपयांत)
विभाग    सहभागी        शेतकऱ्यांनी                क्षेत्र
           शेतकरी        भरलेली रक्कम    
कोकण    ३५,८०९      १,७३,३२,२०५          २१५१४.०१
नाशिक    ३,२२,५३९      २९,५३,३४,७९२    २५०१४४.८३
पुणे            ११,२७,४३५      ४१,६७,९१,१००    ७५१३४१.८४
कोल्हापूर    ९९,८५३      २,७९,६६,३१७    ५६०२१.०६
औरंगाबाद    ४१,८२,७५७       १४३,०३,१८,६६१    १५५८४२१.१३
लातूर    ३६,६५,५३१      १४३,७८,०७,२७३    १८०५२५७.४१
अमरावती    १०,५४,८०९    ६६,२६,०६,८२१    ७६२८२५.१९
नागपूर    २,७३,५९२    १६,२४,०६,२६१    १७३१५५.९३
एकूण    १,०७,६२,३२५    ४४५,०५,६३,४३३    ५३,७८,६८१.४०
........
 

Web Title: One-third percent insurance got of crops in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.