शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरात कांदा निर्यातबंदीचे संकेत

By admin | Updated: June 18, 2014 04:36 IST

आगामी काळात देशात कांद्याचा मुबलक पुरवठा होणार असताना किमान निर्यात मूल्याचे बंधन म्हणजे मोदी सरकार कांदा उत्पादकांना मारायला निघाले आ

योगेश बिडवई, मुंबईदिल्लीत कांद्याचे किरकोळ बाजारातील दर किलोमागे १० रुपयांनी वाढून २५ ते ३० रुपयांवर गेल्यानंतर केंद्र सरकारने मंगळवारी तातडीने कांद्याचे किमान निर्यात मूल्य प्रति टन ३०० डॉलर निश्चित केले. निर्यात मूल्याच्या बंधनामुळे कांद्याच्या दरवाढीला लगाम लागेल, असे सरकारला वाटते. मात्र मोदी सरकारच्या या निर्णयामुळे महिनाभरात कांद्याच्या निर्यातीवर बंदी येऊ शकते, अशी भीती जाणकारांकडून व्यक्त होत आहे. आगामी काळात देशात कांद्याचा मुबलक पुरवठा होणार असताना किमान निर्यात मूल्याचे बंधन म्हणजे मोदी सरकार कांदा उत्पादकांना मारायला निघाले आहे, अशा शब्दांत नाफेडचे संचालक चांगदेव होळकर यांनी केंद्राच्या निर्णयावर टीकास्र सोडले आहे. आणखी एक महिन्याने सरकारने निर्यात बंदी लागू केली तर आश्चर्य वाटायला नको, असेही ते म्हणाले.गेल्या वर्षी मार्च महिन्यात कांद्याचे निर्यात मूल्य शून्यावर आणल्यानंतर आणि मुबलक उत्पादनामुळे मोठ्या प्रमाणात निर्यात झाली होती. त्यामुळे उन्हाळ कांद्याची दरवर्षीपेक्षा कमी साठवणूक झाल्याचे लासलगाव बाजार समितीचे अध्यक्ष नानासाहेब पाटील यांनी सांगितले. उन्हाळ कांद्याची आवक संपल्यानंतर व नवा कांदा बाजार येईपर्यंत आॅक्टोबरनंतर काही काळ काद्यांची आवक कमी होते. ही पोकळी भरून काढण्यासाठी कांद्याची निर्यात रोखण्याचा सरकारचा प्रयत्न दिसतो, असेही पाटील म्हणाले. मात्र देशांतर्गत बाजारपेठेत कांदा मुबलक प्रमाणात असल्याने भाव भडकण्याची चिन्हे नसल्याचे ते म्हणाले.