"भाजपा आमदारांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 02:08 PM2021-07-28T14:08:04+5:302021-07-28T14:27:11+5:30

BJP Ashish Shelar And Flood : भाजपाच्या आमदारांचा एक महिन्यांचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली.

One month salary of BJP MLAs to CM assistance fund for flood victims says BJP Ashish Shelar | "भाजपा आमदारांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला"

"भाजपा आमदारांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला"

Next

मुंबई - राज्यात निर्माण झालेली पूर परिस्थिती आणि सामान्य नागरिक, व्यापारी, शेतकरी, श्रमिकांचे झालेले नुकसान पाहता भाजपाच्या आमदारांचा एक महिन्यांचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती भाजपा नेते आमदार आशिष शेलार (BJP Ashish Shelar) यांनी दिली. आमदार आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. 

"विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत पक्षाच्या झालेल्या बैठकीत भाजपाच्या दोन्ही सभागृहातील आमदारांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा आम्ही निर्णय आम्ही केला आहे. त्यानुसार भाजपाच्या विधानसभा आणि विधान परिषदेतील सर्व सदस्यांनांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करुन घ्यावे व पूरग्रस्तांसाठी जास्तीत जास्त मदत शासनाने करावी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना करीत आहोत" असं देखील म्हटलं आहे. 

राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने कमी होत असतानाही राज्य सरकारने लादलेले निर्बंध कायम असल्याने सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, नोकरदार अक्षरश: वैतागले असून हे निर्बंध तातडीने शिथिल करण्याची मागणी सर्वच स्तरातून होत आहे. निर्बंधांना न जुमानता व्यवहार चालू करण्याशिवाय आता पर्याय नाही, अशी भावना जनमानसात वाढीस लागत आहे. याच दरम्यान भाजपाने यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार निशाणा साधला आहे. 

"मुख्यमंत्री Work From Home करू शकतात, पण मुंबईकरांना...; आज तरी जनहिताचे निर्णय करणार का?"

भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (BJP Keshav Upadhye) यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. आज तरी जनहिताचे निर्णय करणार का? असा सवाल विचारला आहे. मुख्यमंत्री Work From Home करू शकतात, पण मुंबईकरांना ऑफिसला जावेच लागते. लोकल प्रवास बंदीमुळे जनतेत असंतोष आहे असं देखील म्हटलं आहे. केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "आज उद्धव ठाकरे मंत्रिमंडळाची बैठक आहे. आज तरी जनहिताचे निर्णय करणार का? मुख्यमंत्री Work From Home करू शकतात, पण मुंबईकरांना ऑफिसला जावेच लागते. लोकल प्रवास बंदीमुळे जनतेत असंतोष आहे. उद्रेक होण्यापूर्वी राज्य सरकारने तातडीने निर्बंध शिथिल करून लोकल प्रवास सर्वांसाठी सुरू करावा" असं उपाध्ये यांनी म्हटलं आहे. 

Web Title: One month salary of BJP MLAs to CM assistance fund for flood victims says BJP Ashish Shelar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app