शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

विचित्र अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 22:17 IST

भरधाव ट्रकने आॅटोरिक्षाला समोरासमोर धडक दिली. नंतर अपघातग्रस्त आॅटोरीक्षा उलटून पाठीमागून येणाऱ्या दुचाकीवर आदळला. या विचित्र अपघातात आॅटोरीक्षा चालक जागीच ठार झाला. ही घटना बुधवारी सकाळी ९.३0 वाजताच्या सुमारास मुडणा येथे घडली.

ठळक मुद्देमुडाणाची घटना : पोलीस तासभर विलंबाने पोहोचल्याने रोष

लोकमत न्यूज नेटवर्कमुडाणा : भरधाव ट्रकने आॅटोरिक्षाला समोरासमोर धडक दिली. नंतर अपघातग्रस्त आॅटोरीक्षा उलटून पाठीमागून येणाऱ्या दुचाकीवर आदळला. या विचित्र अपघातात आॅटोरीक्षा चालक जागीच ठार झाला. ही घटना बुधवारी सकाळी ९.३0 वाजताच्या सुमारास मुडणा येथे घडली.प्रभाकर दत्तराव शेळके रा.वडद, असे जागीच ठार झालेल्या आरोटरीक्षा चालकाचे नाव आहे. महागाव-उमरखेड मार्गावरील मुडाणाजवळ हा विचित्र अपघात घडला. अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. मात्र त्याचे नाव कळू शकले नाही. तो एकांबा (ता.उमरखेड) येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. महागावकडून उमरखेडकडे निघालेल्या ट्रकने (क्र.एमएच २४-एबी ७२७९) विरुद्ध दिशेने येणाºया आॅटोरीक्षाला समोरासमोर धडक दिली. अपघातानंतर चकनाचूर झालेला आॅटोरीक्षा तीन पलट्या घेत पाठीमागून येणाºया दुचाकीवर (क्र.एमएच २६-एस ८२२६ ) आदळला.या विचीत्र अपघातात आॅटोरीक्षा चालक प्रभाकर शेळके जागीच ठार झाला. दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. नागरिकांच्या मदतीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर काही अंतरावर ट्रक उभा करून चालक फरार झाला. मात्र एक तास लोटूनही पोलीस घटनास्थळी पोहोचले नाही. त्यामुळे संताप व्यक्त केला जात होता. अखेर उशीरा दाखल झालेल्या पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने आॅटो चालकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलविला. अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून महागाव पोलिसांनी तपास सुरू केला.