शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा मार्गावर अपघातात एक ठार

By admin | Updated: February 1, 2016 03:03 IST

मुंबई-गोवा महामार्गावर खारपाडा ब्रीजवर रविवारी पहाटे ४.३० च्या सुमारास पिकअप व्हॅनला टँकरची धडक बसून एक जण ठार झाला, तर चौघे गंभीर जखमी झाले.

पेण : मुंबई-गोवा महामार्गावर खारपाडा ब्रीजवर रविवारी पहाटे ४.३० च्या सुमारास पिकअप व्हॅनला टँकरची धडक बसून एक जण ठार झाला, तर चौघे गंभीर जखमी झाले. पेण पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुुरू आहेत. या भीषण अपघातात टँकर पुलावरच पलटी झाला. पिकअप व्हॅनमधील प्रकाश सोनू सोलकर (रा. खेतवाडी, मुंबई) याचा मृत्यू झाला तर चंद्रकांत पाटील (४६, रा. खेतवाडी), महेश धनराज मोडे (२३, रा. नेरूळ), कोमल जयंत येले (२४), हंस जयंत येले (४, रा. विरार) गंभीर जखमी झाले. पुलाच्या मध्यभागीच अपघात झाल्यामुळे दोन्ही बाजूंकडील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे महामार्गावरची वाहतूक पेण - खोपोली मार्गावरून वळविण्यात आली. सुटीचा दिवस असल्याने कोकणात जाणाऱ्यांची व पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे कोंडीत भर पडली. अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साहाय्याने पुलाच्या कडेला आणून ठेवल्यानंतर वाहतूक सुरू झाली. तब्बल १० तासांनी दुपारी २.०० वाजता वाहतूककोंडी दूर करण्यात पोलिसांना यश आले. (वार्ताहर)ोपोली : कार्ला येथील एकवीरा देवीचे दर्शन घेऊन परत येत असलेल्या भक्तांचा टेम्पो खंडाळा घाटात पलटी झाला. अपघातात नऊ जण जखमी झाले. हा अपघात रविवारी संध्याकाळी ४.३० च्या सुमारास घडला. एकाची प्रकृती गंभीर आहे. हे सर्वजण डोंबिवली व परिसरातील आहेत. त्यांच्या टेम्पोचे ब्रेक खंडाळा घाटात अवघड वळणावर निकामी झाल्याने टेम्पो पलटी झाला. निखील म्हात्रे (१४), बाळू म्हारसे (३७), सोमनाथ म्हात्रे (३५), अक्षय पालेकर (१५), करण भोईर (१५), आदर्श बागडे (१७), समीर म्हात्रे (३६), दत्ता म्हात्रे (४४), सुरेश शेळके (३२) जखमी झाले. त्यांना डोंबिवलीला हलविण्यात आले आहे. निखील म्हात्रेच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.