‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 06:03 IST2025-11-13T06:02:37+5:302025-11-13T06:03:44+5:30
Omkar Elephant: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगली हत्ती ओंकार याला काही काळासाठी गुजरातमधील वनतारा प्राणी संगोपन केंद्रात पाठवावे, तसेच पुढील निर्णयासाठी उच्चस्तरीय समिती नेमावी, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमधील न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि अजित कडेठाणकर यांच्या खंडपीठाने बुधवारी (दि. १२) दिला.

‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
कोल्हापूर - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगली हत्ती ओंकार याला काही काळासाठी गुजरातमधील वनतारा प्राणी संगोपन केंद्रात पाठवावे, तसेच पुढील निर्णयासाठी उच्चस्तरीय समिती नेमावी, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमधील न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि अजित कडेठाणकर यांच्या खंडपीठाने बुधवारी (दि. १२) दिला. याबाबत दाखल असलेली जनहित याचिका कायम राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केल्याची माहिती ॲड.उदय वाडकर आणि ॲड.केदार लाड यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वावरणारा ओंकार हत्ती वनतारा येथे सोडण्याच्या हालचाली गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहेत. याविरोधात प्रा. रोहित कांबळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव आणि वनविभागाच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली आहे. यावर न्यायमूर्ती कर्णिक आणि कडेठाणकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग हा हत्तींचा नैसर्गिक अधिवास आहे. अधिवास बदलणे त्याच्यासाठी धोक्याचे ठरू शकते, अशी भूमिका याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी मांडली.