शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत जकातच कायम राहणार

By admin | Updated: June 15, 2014 02:03 IST

१२ दिवसांच्या पावसाळी अधिवेशनात लोकाभिमुख असे अनेक निर्णय झाले, भरगच्च कामकाज झाले. या अधिवेशनाबाबत आपण पूर्णत: समाधानी आहोत

मुंबई : १२ दिवसांच्या पावसाळी अधिवेशनात लोकाभिमुख असे अनेक निर्णय झाले, भरगच्च कामकाज झाले. या अधिवेशनाबाबत आपण पूर्णत: समाधानी आहोत, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चवहाण यांनी शनिवारी रात्री सांगितले. मुंबई महापालिकेत जकात कर कायम राहील. अन्य महापालिकांसाठी जकात किंवा एलबीटी असे दोन्ही पर्याय खुले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईत जकात कायम राहावी, अशी विनंती महापालिकेनेच केलेली आहे. त्यानुसार पुढेही जकात कायम राहील. अन्य महापालिकांनी जकात कर कायम ठेवावा की एलबीटीचा पर्याय स्वीकारावा याचा निर्णय त्या-त्या महापालिकांनी व्यापारी संघटनांशी चर्चा करून घ्यावयाचा आहे. एलबीटीची वसुली विक्रीकर विभागाच्या यंत्रणेमार्फत करून महापालिकेला उत्पन्नाचा वाटा देण्याचा पर्यायदेखील खुला आहे. यामध्ये वॅटवर सरचार्ज लावावा या पर्यायावरही विचार झाला होता. त्यासाठी अनुकूलता समोर आली तर त्याचाही विचार करता येऊ शकेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. या अधिवेशनात २३ विधेयके पारित झाली. राज्यातील ४४ टोल नाके बंद करण्याचा निर्णय झाला. अल्पसंख्याक विभागासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद, पालघर या नव्या जिल्ह्णाची निर्मिती, डान्स बार बंदीचा नवा कायदा, मुंबई मेट्रोला जोडून ठाणे मेट्रोची उभारणी करण्याचा निर्णय, भांडुप येथे मल्टिस्पेशालिटी हास्पिटल उभारणीबाबतचा निर्णय, अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासंदर्भात मुंबई महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली समिती असे अनेक महत्त्वाचे निर्णय झाले, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. अधिवेशनाचा आणि विद्यमान विधानसभेचा आजचा शेवटचा दिवस होता. कामकाज संपत आले असताना अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तेव्हा ते अतिशय भावूक झाले. मुख्यमंत्री चव्हाण यांनी वळसे-पाटील यांच्या कारकिर्दीची प्रशंसा केली. (विशेष प्रतिनिधी)