शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ८ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ८ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
5
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
6
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
7
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
8
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
9
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
10
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
11
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
12
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
13
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
14
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
15
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
16
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
17
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
18
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
19
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
20
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
Daily Top 2Weekly Top 5

जकात बुडविणारे अटकेत

By admin | Updated: April 2, 2015 04:58 IST

मुंबईत विक्रीसाठी येणाऱ्या विविध कंपन्यांची कर बनावट कागदपत्रे आणि कर पावत्यांच्या आधारे तब्बल १ कोटी ५२ लाख जकात चुकवून मुंबईत

मुंबई : मुंबईत विक्रीसाठी येणाऱ्या विविध कंपन्यांची कर बनावट कागदपत्रे आणि कर पावत्यांच्या आधारे तब्बल १ कोटी ५२ लाख जकात चुकवून मुंबईत आणल्याची धक्कादायक माहिती समोर आली. याप्रकरणी तीन जकात एजंटांना नवघर पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये रॅकेटमध्ये जकात अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तुकाराम बाबू दळवी, नितीन श्रीरंग पवार आणि घन:शाम सीताराम सिंग अशी आरोपींंची नावे आहेत. या ठगांनी साथीदार अशदुल जाकीर शेख, संदीप शिंदे यांच्या मदतीने ही फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले. मुलुंड पूर्वेकडील आनंद नगर जकात नाक्यावर काही ठगांनी मिळून श्याम संकेत आणि ओमसाई नावाने जकात एजंट कार्यालयच थाटले होते. जकात नाक्यावर आलेल्या पालिका अधिकाऱ्यांंच्या मदतीने हे एजंट बनावट कागदपत्रे तयार करून मुंबईमध्ये माल वाहतूक करणाऱ्या कंपन्यांच्या वाहनांना हे एजंट प्रवेश मिळवून देत असत. अशाप्रकारे या जकात एजंटांनी १ एप्रिल २०११ ते ३ डिसेंबरपर्यंत २०१३ पर्यंत बीएमडब्लू कंपनीच्या गाड्यांचा १ कोटी ५२ लाख २३ हजार ६९० रुपयांचा कर बुडवून मुंबईत प्रवेश मिळवून दिल्याचे समोर आले. याप्रकरणी कार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार करताच हा प्रकार उघडकीस आला आणि नवघर पोलिसांनी या तिघांना अटक केली.