राज्यातील कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला १३ लाखांचा टप्पा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2020 06:40 AM2020-09-26T06:40:41+5:302020-09-26T06:40:57+5:30

दिवसभरात ४१६ मृत्यू; बरे झालेल्यांची संख्या दहा लाखांच्या जवळ

The number of corona patients in the state has crossed the 13 lakh mark | राज्यातील कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला १३ लाखांचा टप्पा

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला १३ लाखांचा टप्पा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात शुक्रवारी १७ हजार ७९४ नवीन कोरोना रूग्णांची नोंद झाल्याने एकूण रूग्णसंख्या १३ लाख ७५७ झाली. तर, सध्या २ लाख ७२ हजार ७७५ सक्रिय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात १९ हजार ५९२ रूग्णांना घरी सोडण्यात आले असून कोरोनामुक्तांची संख्या ९ लाख ९२ हजार ८०६ इतकी झाली आहे.


राज्यात सध्या कोरोनामुळे होणारा मृत्युदर २.६७ टक्के आहे. आज दिवसभरात ४१६ मृत्यूची नोंद झाली. आतापर्यंत ३४,७६१ जणांचा मृत्यू झाला. आजच्या ४१६ मृत्युंपैकी २२८ हे मागील ४८ तासांतील आहेत, तर १०६ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत, तर ८२ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. ८२ मृत्युंपैकी सर्वाधिक २२ नाशिकमधील, तर कोल्हापूर १२, पुणे ११, अहमदनगर ६, औरंगाबाद ५, नागपूर आणि सातारा प्रत्येकी ४, जळगाव आणि परभणी प्रत्येकी ३, वर्धा, रायगड आणि पालघरमध्ये प्रत्येकी २ तर, अमरावती, बीड, लातूर, रत्नागिरी, सांगली, ठाणे येथील प्रत्येकी १ मृत्यू आहे. १९ लाख २९,५७२ होम क्वारंटाइन, तर ३२,७४७ संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.


मुंबईत आज कोरोना रुग्णसंख्येत घट
गेले काही दिवस दररोज दोन हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने मुंबईत भीतीचे वातावरण होते. मात्र, शुक्रवारी रुग्ण संख्येत घट झाली असून, दिवसभरात १,८६३ बाधितांचे निदान झाले. रुग्णवाढीचा दैनंदिन सरासरी दर १.११ टक्क्यांवर आला आहे. गुरुवारी २,१६३ रुग्ण आढळले होते. शुक्रवारी १,१६९ रुग्ण बरे झाले. यामुळे आतापर्यंत ८१ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर दिवसभरात ४८ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा ८,७०३ झाला आहे. पालिकेच्या अहवालानुसार, सध्या २८ हजार २७३ सक्रिय रुग्ण आहेत, तर आतापर्यंत एक लाख ५६ हजार ८०७ रुग्ण बरे झाले आहेत. एकूण बाधितांचा आकडा एक लाख ९४ हजार १७७ एवढा आहे, तर आतापर्यंत दहा लाख ५७ हजार ६४० चाचण्या करण्यात आल्या.

Web Title: The number of corona patients in the state has crossed the 13 lakh mark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.