शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
3
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या सेवा आता आपल्या बोटावर!

By admin | Updated: August 23, 2016 18:16 IST

राज्यभरातील वीजग्राहकांसाठी महावितरणने नुकत्याच उपलब्ध करून दिलेल्या अद्ययावत मोबाईल अ‍ॅपला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद लाभत आहे.

ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. २३ : राज्यभरातील वीजग्राहकांसाठी महावितरणने नुकत्याच उपलब्ध करून दिलेल्या अद्ययावत मोबाईल अ‍ॅपला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद लाभत आहे. आजपर्यंत  ४ लाख ३८ हजार ४३९ ग्राहकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. वीज ग्राहकांना विविध सेवा ऑनलाईन, विशेषत: मोबाईलवर उपलब्ध व्हाव्यात म्हणून महावितरणने वीजग्राहकांना मोबाईल अ‍ॅप सुविधा दिलेली आहे.या अ‍ॅपवर वीजबिल पाहणे, ते ऑनलाईन भरणे आदी महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध केल्या आहेत. बिले भरण्यासाठी नेटबँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डसोबतच मोबाईल वॅलेट, कॅश कार्डचा वापर करता येतो. एकापेक्षा जास्त वीज कनेक्शन असतील तर ते एकाच खात्यातून (युजरनेम) हाताळता येतात. विजेसंबंधीच्या सर्व प्रकारच्या तक्रारी नोंदविणे तसेच त्याची सोडवणूक झाली की नाही, याची खातरजमा करता येते. यापुढे ग्राहकांना मोबाईलवर वीजबिलाचे संदेश पाठवले जाणार आहेत. त्यासाठी ग्राहकांना त्यांचे मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी नोंदविण्याची व ते अद्यावत करण्याची सुविधा या अ‍ॅपमध्ये दिली आहे.

ज्या ग्राहकांचे मीटर रीडिंग महावितरणला मिळालेले नाही, अशा ग्राहकांना कंपनीकडून नोंदविलेल्या मोबाईलवर संदेश जाईल. त्यानंतर त्या ग्राहकांना आपल्या मीटरचा फोटो काढून रीडिंग नोंदविण्यासाठी सुविधा उपलब्ध होईल. यामुळे वीजबिलांमधील चुका कमी होऊन ग्राहक तक्रारीही कमी होतील. यात नवीन वीज जोडणीसाठी अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे हे मोबाईल अ‍ॅप ग्राहकप्रिय ठरले असून, आतापर्यंत ४ लाख ३८ हजार ४३९  ग्राहकांनी ते डाऊनलोड केले आहे.

वीज ग्राहकांसह महावितरणने कर्मचाऱ्यांसाठीही मोबाईल अ‍ॅप उपलब्ध करून दिले आहे. या अ‍ॅपवर ग्राहकांना  सेवांबद्दलचा अभिप्राय देखील नोंदवता येतो. ग्राहकांसाठीचे अ‍ॅप 'गुगल प्लेस्टोअर', 'अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर', ‍'विंडोज स्टोअर' तसेच महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ते अँड्रॉईड, विंडोज व आयओएस ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करते.