Palghar Mob Lynching: त्यांना शक्य तितकी कडक शिक्षा देऊ; पालघरमधील प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 04:52 AM2020-04-20T04:52:48+5:302020-04-20T07:59:23+5:30

धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांची नजर; गृहमंत्र्यांची माहिती

Nobody guilty will be spared says cm uddhav thackeray over palghar attack which killed three kkg | Palghar Mob Lynching: त्यांना शक्य तितकी कडक शिक्षा देऊ; पालघरमधील प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल

Palghar Mob Lynching: त्यांना शक्य तितकी कडक शिक्षा देऊ; पालघरमधील प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल

Next

मुंबई: डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोर आल्याच्या संशयाने ग्रामस्थांच्या जमावाने तिघांची हत्या केल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली. या घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणातल्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना शक्य तितकी कडक शिक्षा करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. 

पालघर येथे घडलेल्या घटनेवर कारवाई करण्यात आली आहे. ज्या दिवशी गुन्हा घडला, त्याच दिवशी पोलिसांनी २ साधू, १ ड्रायव्हर आणि पोलिस कर्मचार्‍यांवर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यातील आणि लज्जास्पद कृत्यातील आरोपींना शक्य तितकी कडक शिक्षा करण्यात येईल, असं ट्विट मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.



पालघरमधल्या घटनेवरुन धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली. 'मुंबईहून सूरतला निघालेल्या तिघांची पालघर येथील हत्येची राज्य सरकारने गंभीर दखल घेऊन हल्ल्यात सामील १०१ जणांची अटक केली गेली आहे आणि उच्च स्तरीय चौकशीचे आदेशही दिले आहेत', अशी माहिती त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.



पालघरमधल्या घटनेवरून कोणीही धार्मिक तेढ निर्माण करू असं आवाहन गृहमंत्र्यांनी केलं. 'कुणीही या घटनेचं विवाद करुन सामाजिक/जातीय तेढ निर्माण करत नाही यावरही सरकार लक्ष ठेऊन आहे. हल्ला करणारे व ज्यांच्या वर हल्ला झाला या पैकी कुणीही वेगळे धर्मीय नाहीत. उगाचच समाजात/ समाज माध्यमांतून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिस व सायबर क्राईमला दिले आहेत,' अशी माहिती देशमुख यांनी दिली आहे.

पालघरमध्ये नेमकं काय घडलं?
डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोर आल्याच्या संशयाने ग्रामस्थांच्या जमावाने तिघांची हत्या केल्याची घटना गेल्या आठवड्यात गुरुवारी रात्री घडली. यावेळी समजूत घालण्यासाठी आलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केला. या प्रकरणी कासा पोलिसांनी ११० जणांना अटक केली. हा हल्ला गावात चोर आल्याच्या अफवेमुळे झाल्याचे समजते.

हल्ल्यात सुशीलगिरी महाराज (३०), चिकने महाराज कल्पवृक्षगिरी (७०, रा. कांदिवली आश्रम) व चालक नीलेश तेलगडे (३०) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तालुक्यातील दिवशी या ग्रामपंचायतमधील गडचिंचले येथे हा प्रकार घडला. मुंबईतील कांदिवली येथून सुरतकडे कारने जाणाऱ्या तिघांना गुरुवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील गडचिंचले येथे चोर समजून २५० ते ३०० च्या जमावाने रोखले. जमावाने त्यांच्यावर कोयती, कुऱ्हाडी आणि दगडांच्या सहाय्याने हल्ला केला. येथील वनचौकीवर कार्यरत वनरक्षकाने याची माहिती पोलिसांना दिली. तिथे आलेल्या पोलिसांवरही जमावाने हल्ला केला. त्यात चार पोलीस जखमी झाले आहेत. पोलिसांच्या चार गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Web Title: Nobody guilty will be spared says cm uddhav thackeray over palghar attack which killed three kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.