शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
3
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
4
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
5
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
6
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
7
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
8
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
9
मोठी बातमी : यजमान वेस्ट इंडिजने अखेरच्या क्षणाला संघ बदलला, अनुभवी खेळाडूची स्पर्धेतून माघार   
10
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
11
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
12
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही, महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांच्या विधानानं राज्यभरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2018 10:23 PM

जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी एक मोठा निर्णय जाहीर केला आहे.

कोल्हापूर : जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. यापुढच्या काळात मी कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचं चंद्रकांतदादांनी स्पष्ट केलं आहे. चंद्रकांत पाटलांच्या या विधानानं भाजपासह राज्यभरात खळबळ उडाली आहे. कोल्हापूर येथे पोलीस दलातर्फे गणराया अवॉर्ड वितरण सोहळ्यामध्ये त्यांनी आपला हा निर्णय जाहीर केल्याने याचीच चर्चा कार्यक्रमानंतर रंगली.गतवर्षीही मंत्री पाटील यांनी साउंड सिस्टीमविरोधात भूमिका घेतली होती. त्याचाच धागा पकडून ते म्हणाले, यापुढे मी लोकसभा, विधानसभा, विधानपरिषद किंवा पदवीधर यांपैकी कोणतीही निवडणूक लढवणार नाही. त्यामुळे गणेशोत्सवात साउंड सिस्टीम लावू नये, हा काही माझा राजकीय अजेंडा नाही. पारंपरिक वाद्य व्यावसायिकांकडून मला काही दहा टक्के कमिशन मिळत नाही. गतवर्षी कोल्हापुरातील गणेश मंडळांनी पारंपरिक वाद्ये लावावीत, याबाबत मी अनेक मंडळांना भेटलो, त्यांचे प्रबोधन केले. या विधायक उपक्रमाचा सर्वत्र चांगला संदेश गेला. मात्र यामुळे काही मंडळे दुखावली गेली. तथापि न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान होऊ नये व सण-उत्सवांत नागरिकांचा आनंद द्विगणित व्हावा, हा त्यामागील उद्देश आहे, असे ते म्हणाले.राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यापासून अनेक नेत्यांनी याआधीही चंद्र्रकांत पाटील यांनी जनतेतून निवडून यावे, असे आवाहन अनेकदा केले होते. तसेच मंत्री पाटील हेच कोल्हापूर उत्तर किंवा राधानगरी, भुदरगड, आजरा विधानसभा मतदारसंघांतून निवडणूक लढवतील, अशीही चर्चा मध्यंतरी जोरदारपणे सुरू होती. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी निवडणूक लढविणार नसल्याची घोषणा केल्याने ‘पदवीधर’च्या निवडणुकीसाठीही भाजपला वेगळा उमेदवार शोधावा लागणार आहे........................................निवडणूक न लढविण्याची कारणेचंद्रकांत पाटील हे गेली अनेक वर्षे कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांच्या भाजप- शिवसेना युतीच्या राजकारणात नेहमी महत्त्वाची भूमिका बजावत आले आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये या तीनही जिल्ह्यांमध्ये विविध संस्था आणि मतदारसंघांमध्ये भाजपचा झेंडा फडकवण्यामध्ये चंद्रकांत पाटील यांनी अतिशय नेमकी भूमिका बजावली आहे. या तीनही जिल्ह्यांतून आगामी विधानसभेला भाजपचे १५ उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी मंत्री पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळेच स्वत:ला कोणत्याही निवडणुकीत अडकवून घेण्याचा निर्णय पाटील यांनी घेतला असावा, अशी पक्षामध्ये चर्चा सुरू आहे.

 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपा