"भाजपमध्ये आल्यापासून सगळं निवांत; चौकशीचा त्रास नाही, शांत झोप लागते"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 11:32 AM2021-10-13T11:32:03+5:302021-10-13T11:38:42+5:30

दोन वर्षांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला

no enquiry since i joined bjp says former congress leader harshwardhan patil | "भाजपमध्ये आल्यापासून सगळं निवांत; चौकशीचा त्रास नाही, शांत झोप लागते"

"भाजपमध्ये आल्यापासून सगळं निवांत; चौकशीचा त्रास नाही, शांत झोप लागते"

Next

पुणे: भारतीय जनता पक्षाकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून वारंवार करण्यात येतो. तर भाजपकडून कायम या आरोपांचा इन्कार केला जातो. त्यात आता भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या एका विधानाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. पाटील यांनी दोनच वर्षांपूर्वी काँग्रेसचा हात सोडून कमळ हाती घेतलं. 

मिश्किल विधानांसाठी ओळखल्या जाणाऱ्या पाटील यांनी काल मावळमधील एका कार्यक्रमात एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. आपण काँग्रेस सोडून भाजपमध्ये का आलो, या प्रश्नाचं उत्तर यावेळी पाटील यांनी दिलं. या कार्यक्रमाला विधान परिषदेचे नेते प्रविण दरेकर, माजी मंत्री बाळा भेगडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके उपस्थित होते.

'स्टेज गमतीशीर आहे. आम्हाला भारतीय जनता पक्षात जावं लागलं. स्टेजवर एकानं बसल्या बसल्या विचारलं भाजपमध्ये का गेलात..? मी त्यांना म्हटलं, हे मला विचारण्यापेक्षा आपल्या नेत्याला विचारा हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये का गेला? सध्या सगळं मस्त आहे, निवांत आहे. चौकशी वगैरे काही नाही. शांत झोप लागते,' असं पाटील म्हणाले.

Web Title: no enquiry since i joined bjp says former congress leader harshwardhan patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app