नितीन गडकरी दिल्लीत खूश

By Admin | Updated: June 9, 2014 02:47 IST2014-06-09T02:47:31+5:302014-06-09T02:47:31+5:30

दिल्लीत मी खूश आहे, महाराष्ट्रात परतणार नाही, असे स्पष्ट करीत भाजपाचे राष्ट्रीय नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले.

Nitin Gadkari is happy in Delhi | नितीन गडकरी दिल्लीत खूश

नितीन गडकरी दिल्लीत खूश

नागपूर : दिल्लीत मी खूश आहे, महाराष्ट्रात परतणार नाही, असे स्पष्ट करीत भाजपाचे राष्ट्रीय नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गोपीनाथ मुंडेनंतर महाराष्ट्रात कोण, या चर्चेला पूर्णविराम दिला. गडकरी यांनी येथील पत्रकारांशी रविवारी संवाद साधला.
केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे राज्यात भाजपामध्ये पोकळी निर्माण झाली आहे. ती भरून काढण्यासाठी विधानसभेत भाजपाला बहुमत मिळाल्यास महाराष्ट्रात परत येणार का, यावर त्यांनी नकार दिला. ते म्हणाले, माझी अगोदर दिल्लीत जाण्याची इच्छाच नव्हती. परंतु आता दिल्लीत गेलो आहे. त्यामुळे तेथून पुन्हा महाराष्ट्रात येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. स्वतंत्र विदर्भाला भाजपाचा पाठिंबा राहिला असून, तो आजही कायम आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Nitin Gadkari is happy in Delhi