शहरं
Join us  
Trending Stories
1
राजधानी एक्स्प्रेसला लागली भीषण आग, दिल्लीहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  
2
महाराष्ट्रात सरकारी नोकर भरती प्रक्रियेचा कायापालट ! 'बकेट सिस्टीम'चा आधार! कालबाह्य ११०० नियमांना फाटा
3
IPL 2026च्या पॉईंट्स टेबलमध्ये खरी उलथापालथ आज होणार, पंजाबचं भवितव्य ठरणार, सोबतच...
4
सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर धाड, संपत्ती पाहून तपास यंत्रणाही हादरली; एवढा पैसा आला तरी कुठून?
5
PM Modi: मोदींच्या नेदरलँड्स दौऱ्यात मोठी घोषणा, गुजरातमध्ये उभारणार अत्याधुनिक सेमीकंडक्टर प्लांट!
6
"राजा शिवाजी बघण्याआधीच बाबा गेले...", दिशा परदेशीची खंत, म्हणाली- "ते लोकांना फोन करून सांगत होते की..."
7
तुरुंगात असूनही भोंदू अशोक खरातला जॅकपॉट; सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनातून ३ कोटी मिळणार
8
'दुष्काळात तेरावा' नाही, यंदा सुख-समृद्धीचा १३ वा महिना! 'ज्येष्ठ अधिकमास' सुरू; सण-उत्सव २० दिवस लांबणीवर
9
दोन देशात जीवघेण्या विषाणूचा कहर, WHO अलर्टवर, घोषित केली हेल्थ इमर्जन्सी
10
IPL 2026: कोलकाता- गुजरात सामन्याची इतिहासात नोंद; T20 मध्ये पहिल्यांदाच असं घडलं!
11
आजचे राशीभविष्य - १७ मे २०२६, नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील
12
मौनी रॉय अन् सूरज नांबियारचं पॅचअप? घटस्फोट जाहीर केल्यानंतरही पुन्हा केलं एकमेकांना फॉलो
13
आनंदवार्ता ! मान्सून अंदमान, निकोबारमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी एन्ट्री? 
14
विकी कौशलच्या वाढदिवशी कतरिनाची भावुक अन् मजेशीर पोस्ट, छोट्या विहानचीही दिसली झलक
15
हे दशक आपत्तींचे; ...तर गरिबीच्या खाईत अडकू; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा
16
मुलीसाठी पाच लाखांत पेपर विकत घेतला? सीबीआयकडून नांदेडात पालकांची चौकशी 
17
'पॉलिटिकल स्टार्टअप'चे दिवस! कमल हासन-चिरंजीवी ठरले 'बर्न आउट', तर 'थलपती' विजय बनला लेटेस्ट 'राजकीय युनिकॉर्न'
18
प्रा. मनीषा मांढरे सीबीआयच्या जाळ्यात; पुण्यातील तिसरी अटक
19
साक्रीत दुहेरी हत्याकांड; भोंदू बाबा गजाआड, अघोरी पूजेतून वाद झाल्याने हत्या करून मृतदेह पुरले
20
‘कारकुनी चुकी’मुळेच गोंधळ; पटेल, तटकरे पदावर कायम; अजित पवार गट आता निवडणूक आयोगाला नव्याने पत्र पाठवणार
Daily Top 2Weekly Top 5

निसर्ग चक्रीवादळ आज रायगडला धडकणार; संचारबंदी जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 06:43 IST

आपत्कालीन यंत्रणा सतर्क : मुंबई, ठाणे, पालघरमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई/अलिबाग/पालघर : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे निर्माण झालेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ कोकण किनारपट्टीकडे कूच करीत असून बुधवारी दुपारी ते अलिबागला धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण कोकण पट्टा आणि दमण, गुजरात परिसरात ताशी १२० किमी वेगाने वारे वाहणार आहेत. तसेच मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने ‘रेड अलर्ट’ देऊन मुंबईसह किनारपट्टी भागात संचारबंदी जारी केली आहे. रायगडच्या किनारपट्टी भागातून ४० हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. भारतीय नौसेना, भारतीय तटरक्षक दल व सर्व आपत्कालीन यंत्रणा सतर्क असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.


मुंबईसह कोकणात चक्रीवादळ सहसा धडकत नाहीत. २००९ साली फियान चक्रीवादळ मुंबईजवळच्या किनारपट्टीला धडकले होते. हा अपवाद वगळता या आपत्तीचा सामना करण्याची वेळ आता आल्याने खबरदारी म्हणून रायगड आणि पालघर जिल्ह्यांत एनडीआरएफच्या १५, एसडीआरएफच्या पाच तुकड्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून पाच तुकड्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास अरबी समुद्रातील चक्रीवादळ पणजीपासून २८० किमी, मुंबईपासून ४३० किमी आणि सुरतपासून ६४० किमी अंतरावर होते. ताशी ११ किलोमीटर या वेगाने ते उत्तर-पूर्व दिशेकडे सरकत आहे. पुढच्या बारा तासांमध्ये याचा वेग आणखी वाढेल. बुधवारी दुपारी किंवा संध्याकाळी ते उत्तर मध्य महाराष्ट्र आणि गुजरातदरम्याचे हरिहरेश्वर, दमण आणि अलिबाग ओलांडेल. यावेळी येथे ताशी १२० किमी वेगाने वारे वाहतील आणि किनारपट्टी भागात अतिमुसळधार पाऊस पडेल.
173000
नागरिक प्रभावित होण्याची शक्यता

अलिबाग : रायगडमधील सात तालुक्यांतील समुद्र तसेच खाडी किनाऱ्यांवरील ६० गावांमधील सुमारे एक लाख ७३ हजार नागरिक प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्यातील तब्बल ४० हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे.

सिंधुदुर्गात समुद्राच्या लाटांची उंची वाढली
कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सिंधुदुर्गमध्ये मंगळवार दुपारी साडेबारानंतर समुद्राच्या लाटांची उंची वाढली असून वाºयाने जोर धरण्यास सुरुवात केल्याने किनारपट्टी भागात घबराटीचे वातावरण आहे. रत्नागिरीतही अशीच स्थिती आहे.

पालघर किनारपट्टीवर दहशत;
ताशी १२० किमी वेगाने वारे वाहणार
डहाणू तालुक्यातील किनाºयावरील सतीपाडा, दिवादांडी, मांगेलवाडा, आगर, नरपड, धाकटी डहाणू, तडियाले, गुंगवाडा, घोलवड, बोर्डी आदी भागातील नागरिकांना सुरक्षितता म्हणून प्रशासनाने केएल पोंदा हायस्कूल, सेंट मेरीज हायस्कूल व दोन सभागृहांत हलविले आहे.
याच भागाला वादळाचा सर्वाधिक तडाखा बसण्याची शक्यता आहे. किनाºयावर वादळपूर्व स्थिती निर्माण होत असून मंगळवारी दुपारपासूनच पावसाच्या हलक्या सरींची रिपरिप सुरू आहे. मच्छीमारांना समुद्रात मासेमारी करण्यास प्रशासनाने अगोदरच मनाई केली आहे.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ