शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

Nipah Virus: धोका वाढला! राज्यातील वटवाघूळांमध्ये पहिल्यांदाच 'निपाह' विषाणू आढळला; मृत्यूदर ६५% असल्यानं चिंतेत भर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 10:20 AM

Nipah Virus: राज्यात कोरोना संकट असताना आता निपाह विषाणूदेखील आढळून आला; साताऱ्यातील गुफांमध्ये आढळला निपाह विषाणू

मुंबई/पुणे: कोरोनाची दुसरी लाट ओसरली असताना तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. तिसरी लाट थोपवण्यासाठी सध्या राज्यभरात लसीकरण अभियानाला वेग देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यातच आता महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी आहे. राज्यातील वटवाघळांच्या दोन प्रजातींमध्ये निपाह विषाणू आढळून आला आहे. राज्यातील वटवाघळांमध्ये निपाह विषाणू आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीच्या तज्ज्ञांनी याबद्दलचं संशोधन केलं आहे.पुण्यातून गुड न्यूज! कोरोनाविरोधात जुनंच शस्त्र येणार कामी, लहान मुलांसाठी ठरणार संजीवनी

निपाह विषाणू असलेल्या वटवाघळांच्या प्रजाती साताऱ्यातल्या महाबळेश्वरमधील गुफेत मार्च २०२० मध्ये आढळून आल्या. याआधी राज्यात कधीही वटवाघळांमध्ये निपाह विषाणू आढळून आला नव्हता अशी माहिती याबद्दलचं संशोधन करणाऱ्या पथकाच्या प्रमुख डॉ. प्रज्ञा यादव यांनी दिली. देशात याआधी काही राज्यांमध्ये निपाह विषाणू आढळून आला आहे. हा विषाणू वटवाघूळांमधून माणसांमध्ये संक्रमित होतो.कोरोनाचा नवा व्हेरिएंट लस, रोगप्रतिकारशक्तीलाही देऊ शकतो चकवा? तज्ज्ञांकडून धोक्याचा इशारा

निपाह विषाणू अतिशय धोकादायक मानला जातो. निपाहवर कोणतंही औषध किंवा लस उपलब्ध नाही. निपाह विषाणूची लागण झाल्यानंतरचा मृत्यूदर खूप जास्त आहे. कोरोनाची लागण झालेल्यांपैकी बहुतांश जण बरे होतात. देशातील जवळपास सगळ्याच राज्यांचा रिकव्हरी रेट ९० टक्क्यांच्या पुढे आहे. तर मृत्यूदर १ ते २ टक्क्यांच्या दरम्यान आहे. निपाहवर औषध उपलब्ध नसल्यानं मृत्यूदर तब्बल ६५ टक्क्यांच्या पुढे आहे.

गेल्या काही वर्षांपासून वटवाघळांमुळे विषाणू पसरत असल्याचं वारंवार समोर आलं आहे. इबोला, मारबर्ग यासारखे विषाणू वटवाघुळांमुळेच पसरले होते. कोरोना विषाणूच मूळदेखील वटवाघळांमध्येच असल्याची शक्यता काही तज्ज्ञांनी वर्तवली आहे. 

निपाह विषाणूचा सर्वप्रथम १९९८-९९ साली मलेशियात आढळून आला. डुकरं आणि डुकरांची काळजी घेणाऱ्यांमध्ये तेव्हा हा विषाणू आढळून आला. त्यावेळी मृत्यूदर ४० टक्के होता. २००१ मध्ये पश्चिम बंगालच्या सिलिगुडीत निपाह आढळला. यानंतर २००७ मध्ये पश्चिम बंगालच्याच नाडिया जिल्ह्यात निपाह आढळला. २०१८ मध्ये केरळच्या कोझिकोडेत निपाहमुळे १८ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर २०१९ मध्ये पुन्हा कोझिकोडेत निपाह आढळून आला.

टॅग्स :Nipah Virusनिपाह विषाणूcorona virusकोरोना वायरस बातम्या