पुणो : केवळ नऊवारी नेसणं म्हणजे लावणी नव्हे, तर त्यातले शब्द, अभिनय चेह:यावरील भावना ज्याला समजतात, तोच व्यक्ती लावणीचा खरा आनंद घेऊ शकतो. नाहीतर बाकीचे व्यक्ती लावणी म्हटलं, की नाक मुरडतात, अशी भावना ज्येष्ठ मधू कांबीकर यांनी व्यक्त केली.
सदाशिव चित्र संस्थेतर्फे आयोजित पहिल्या गोंदण पुरस्कार वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ, सदाशिव जावडेकर, आशिष केसकर, दिग्दर्शिका विनीता पिंपळखरे उपस्थित होत्या.
उल्लेखनीय कार्य करणा:यांचा सन्मान या वेळी करण्यात आला. लावणी नर्तिका वर्षा संगमनेरकर, बालगंधर्व परिवाराचे मेघराज राजेभोसले व लावणी संशोधक विद्याधर जिंतीकर यांना गोंदण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
तसेच, या कार्यक्रमाचे औचित्य साधून गोंदण या चित्रपटाच्या ध्वनिफितीचा प्रकाशन सोहळाही या वेळी करण्यात आला.
राजदत्त, सपकाळ, राजेभोसले, संगमनेरकर यांनीही मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)
4आजही समाजजीवनाचा मोठा भाग म्हणून लावणी व तमाशाकडे पाहिले जाते. त्यामुळे स्त्री कलाकारांनी या क्षेत्रत जास्तीत जास्त पुढे
जावे आणि मराठी सिनेसृष्टीत आपला ठसा उमटवला
पाहिजे. लावणी ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे तिचे जतन होणो गरजेचे आहे,
असे मत कांबीकर यांनी व्यक्त केले.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}