शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील सीसीटीव्हीसाठी पडले पुढचे पाऊल !

By admin | Updated: February 28, 2015 05:14 IST

गेल्या सात वर्षांपासून रेंगाळलेल्या आणि मुंबईकरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या शहर व उपनगरांत ६ हजार सीसीटीव्ही कॅमेरे

जमीर काझी, मुंबई गेल्या सात वर्षांपासून रेंगाळलेल्या आणि मुंबईकरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या शहर व उपनगरांत ६ हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने आणखी एक पुढचे पाऊल टाकले आहे. निर्धारित मुदतीमध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्याचा आढावा आणि देखरेख समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. गृह विभागाचे अपर मुख्य सचिव के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्यासह नऊ जणांचा समावेश आहे.प्रकल्पाची सरकारने जबाबदारी लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर सोपविण्यात आलेली आहे. सात फेबु्रवारीला राज्य सरकारचा त्याबाबत सामंजस्य करार झालेला ्रअसून, सप्टेंबर २०१६ पर्यंत तीन टप्प्यामध्ये हे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यासाठी ९४९ कोटी खर्च आहे. जागतिक दर्जाचे उच्च क्षमता असलेले १४९२ कॅमेरे, तर २० थर्मल आणि ४ हजार ८५० फिक्स बॉक्स कॅमेरे असणार आहेत. ‘२६/११’च्या घटनेनंतर मुंबईत महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय तत्कालीन कॉँग्रेस आघाडी सरकारने घेतलेला होता. त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली, मात्र कॅमेऱ्यांचा दर्जा, किमतीबाबत पोलीस महासंचालक व गृह विभागामध्ये मतभेद असल्याने निविदा प्रक्रियेतच प्रस्ताव रखडला होता. अनेक वेळा निविदा काढूनही दर्जा आणि अटीमुळे एकही इच्छुक उत्पादक कंपनी पात्र ठरत नव्हती. अखेर मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी त्याबाबत तत्पर निर्णय घेत रखडलेली प्रक्रिया मार्गी लावली. ‘लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो’च्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी आज वरिष्ट अधिकाऱ्याची समिती गठित करण्यात आली.