"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 16:22 IST2025-07-12T16:22:14+5:302025-07-12T16:22:39+5:30
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले होते. याबाबत राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया समोर आल्या होत्या.

"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
Jayant Patil : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले होते. याबाबत राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे नवीन प्रदेशाध्यक्ष होणार असल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट शेअर करुन राजीनामा दिला नसल्याचे म्हटले आहे.
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करुन राजीनामा दिला नसल्याचा दावा केला आहे. "जयंत पाटील साहेब हे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या राजीनाम्याच्या बातम्या प्रसारीत होणे , हा निव्वळ खोडसाळपणा आहे. पक्ष एका नियमानुसार अन् शिस्तीनुसारच चालत असतो", असं जितेंद्र आव्हाड यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
मा. जयंत पाटील साहेब हे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या राजीनाम्याच्या बातम्या प्रसारीत होणे , हा निव्वळ खोडसाळपणा आहे. पक्ष एका नियमानुसार अन् शिस्तीनुसारच चालत असतो.@PawarSpeaks@supriya_sule@Jayant_R_Patil
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 12, 2025
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मागील वर्षी झालेल्या वर्धापन दिनापासूनच प्रदेशाध्यक्षपदाबाबत चर्चा सुरू होत्या. प्रदेशाध्यक्षपदाबाबत पक्षात अंतर्गत मतभेद असल्याचे बोलले जात होते. खासदार शरद पवार यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद दुसऱ्या नेत्याकडे देण्याची मागणी अनेकांनी केली असल्याची माहिती समोर आली होती. यामुळे जयंत पाटील काही दिवसातच पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा होती. अखेर आज पाटील यांनी पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली पण ही बातमी खोडसाळपणा असल्याचा दावा आव्हाड यांनी केला.