शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
5
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
6
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
7
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
8
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
9
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
10
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
11
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
12
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
13
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
14
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
15
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
16
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
17
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
18
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
19
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
20
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
Daily Top 2Weekly Top 5

भाड्याच्या वाहनाने न्यूझीलंडची मुशाफिरी

By admin | Updated: November 8, 2014 04:00 IST

टुरबरोबर गेल्यावर देशाचे सौंदर्य न्याहाळण्यासाठी पाहिजे तितका वेळ मिळत नाही. हे सौंदर्य न्याहाळण्यासाठी स्वत:ची गाडी पाहिजे,

मुंबई : टुरबरोबर गेल्यावर देशाचे सौंदर्य न्याहाळण्यासाठी पाहिजे तितका वेळ मिळत नाही. हे सौंदर्य न्याहाळण्यासाठी स्वत:ची गाडी पाहिजे, असे वाटत असले तरी परदेशात प्रत्येक वेळी ते शक्य होत नाही. मात्र न्यूझीलंडची मुशाफिरी करण्यासाठी पर्यटकांना भाड्यावर वाहने मिळतात. हार्ले डेव्हिडसन बाईकवरून मनसोक्त हिंडण्याचा आनंदही न्यूझीलंडमध्ये लुटता येतो, असे न्यूझीलंड संघाचे माजी कर्णधार स्टिफन फ्लेमिंग यांनी सांगितले. येता वर्ल्डकपचे यजमानपद हे न्यूझीलंडकडे आहे. वर्ल्डकपच्या चार महिन्यांच्या कालावधीत क्रिकेटप्रेमी हजारोंच्या संख्येने न्यूझीलंडमध्ये नक्कीच दाखल होणार. मात्र, इतर वेळीही निसर्गसौंदर्य, अ‍ॅडव्हेंचर आणि आरामदायी सुटी घालवण्यासाठी अनेक जण न्यूझीलंडचा पर्याय निवडतात. भारतातून दरवर्षी सुमारे ३५ हजार पर्यटक हे न्यूझीलंडला भेट देतात. क्वीन स्टॅण्ड हे अत्यंत सुंदर असे पर्यटनस्थळ आहे. या एका पर्यटनस्थळावर अनेक अ‍ॅडव्हेंचरचा अनुभवदेखील पर्यटकांना घेता येतो, असे न्यूझीलंड टुरिझमचे आशिया जनरल मॅनेजर डेव्हीड क्रेग यांनी सांगितले. अ‍ॅडव्हेंचर टूर करण्यासाठी देखील न्यूझीलंड हे एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे.या देशात अनेक ठिकाणी वॉटर राफटिंगसारखे साहसी खेळ अनुभवता येतात. न्यूझीलंड येथील हॉकलंड परिसरात ४५ कि.मी.चा त्रिकोणी प्रदेशही अनेक पर्यटकांना आकर्षित करतो. भारतीय पर्यटकांना न्यूझीलंडपर्यंतचा प्रवास सोपा व सुखकर व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पर्यटनस्थळांची जाहिरात जागतिक स्तरावर केली जात असल्याचे फ्लेमिंग यांनी सांगितले. (प्रतिनिधी)