शाळांच्या सहलीसाठी मिळणार 'एसटी'च्या नव्या बसेस; विद्यार्थ्यांना घेता येणार संस्मरणीय अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 13:00 IST2025-11-16T12:59:22+5:302025-11-16T13:00:09+5:30

राज्यभरातील २५१ आगारांमधून रोज ८०० ते १००० बसेस सहलीसाठी देणार

New ST buses will be available for school trips students will be able to have a memorable experience | शाळांच्या सहलीसाठी मिळणार 'एसटी'च्या नव्या बसेस; विद्यार्थ्यांना घेता येणार संस्मरणीय अनुभव

शाळांच्या सहलीसाठी मिळणार 'एसटी'च्या नव्या बसेस; विद्यार्थ्यांना घेता येणार संस्मरणीय अनुभव

'स्वस्त आणि सुरक्षित' प्रवासाचा आनंद घेण्यासाठी यंदा शाळा-महाविद्यालयांना शालेय सहलीसाठी एसटी महामंडळ नवीन बसेस उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. दरवर्षीप्रमाणे दिवाळी सुट्टी संपली की, शाळेच्या विद्यार्थ्यांना विविध प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी सहलीचे वेध लागतात. शालेय सहली हा विद्यार्थी जीवनातील अतिशय संस्मरणीय असा अनुभव असतो. राज्य शासन एसटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय सहलीसाठी त्यांच्या एकूण भाड्यामध्ये ५०% टक्के सवलत देते. त्यामुळे अतिशय माफक दरात विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील विविध धार्मिक, ऐतिहासिक पर्यटन स्थळांना भेट देणे शक्य होते. तो त्यांच्या शालेय अभ्यासक्रमातील एक उपक्रम असतो.

यंदा एसटीकडे असलेल्या नवीन बसेस या शालेय सहलीसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. राज्यभरात असलेल्या एसटीच्या २५१ आगारांमधून दररोज ८०० ते १००० बसेस विविध शाळा- महाविद्यालयांना सहलीसाठी उपलब्ध करून दिल्या जातील, अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले.

गेल्या वर्षी १९,६२४ बसेस

मागील वर्षी नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान राज्यभरातील विविध शाळा- महाविद्यालयांना शालेय सहलीसाठी एसटी महामंडळाने तब्बल १९६२४ बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या. या माध्यमातून एसटीला तब्बल ९२ कोटी रुपयांचा (प्रतिपुर्ती रक्कमेसह ) महसूल प्राप्त झाला होता. यंदा देखील प्रत्येक आगारातून त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळा- महाविद्यालयांना दररोज एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात बाबत आवाहन करण्यात येत आहे. आगारप्रमुख, स्थानकप्रमुख स्वतः शाळा -महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांना भेटून विविध धार्मिक ऐतिहासिक पर्यटन स्थळांच्या सहलीचे आयोजन करण्यासाठी आवाहन करीत आहेत.

Web Title : स्कूल ट्रिप के लिए नई एसटी बसें: छात्रों के लिए यादगार अनुभव

Web Summary : महाराष्ट्र राज्य परिवहन स्कूल यात्राओं के लिए 50% छूट के साथ नई बसें प्रदान करेगा। लगभग 251 डिपो से प्रतिदिन 800-1000 बसें। पिछले साल 19,624 बसें दी गईं, जिससे अच्छा राजस्व प्राप्त हुआ। अधिकारी स्कूलों को यात्रा आयोजित करने के लिए प्रोत्साहित कर रहे हैं।

Web Title : New ST Buses for School Trips: Memorable Experience for Students

Web Summary : Maharashtra State Transport will provide new buses for school trips with 50% discount. Approximately 800-1000 buses daily from 251 depots. Last year, 19,624 buses were provided, generating significant revenue. Officials are encouraging schools to organize trips.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.