शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

मग्रारोहयोच्या अंमलबजावणीसाठी नवी पदस्थापना

By admin | Updated: July 31, 2014 01:30 IST

उपमुख्य कार्यकारी अधिकारी दर्जाची १२ पदे : राज्यातील १२ जिल्ह्यांचा समावेश.

गिरीश राऊत / खामगावमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी शासनाने राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी दर्जाची पदं निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांच्यावरील कामाचा ताण कमी होऊन, त्यांची तसेच मग्रारोहयोची कामे सुरळीत होण्यास मदत होणार आहे. शासनाच्यावतीने राबविण्यात येणार्‍या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे ग्रामपंचायतीने करणे अनिवार्य आहे. यासाठीचे नियोजन पंचायत समिती, जिल्हा परिषदला करावे लागते. या योजनेंतर्गत करावयाच्या कामांच्या अंमलबजावणीस ग्रामसभा, ग्रामपंचायत, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदकडून मंजुरी दिली जाते. जिल्हा स्तरावर या योजनेचे समन्वयन जिल्हा कार्यक्रम समन्वयक तथा जिल्हाधिकारी तसेच सहजिल्हा कार्यक्रम समन्वयक तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे करतात. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांना त्यांच्या मूळ विभागाची जबाबदारी सांभाळून मग्रारोहयोची कामेसुद्धा सांभाळावी लागतात. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये र्मयादा येत होत्या. या बाबींचा विचार करता तसेच मग्रारोहयोच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गटविकास अधिकारी (रोहयो) (वर्ग २) हे पद पुरेसे नसल्याने उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गट अ या संवर्गातील पदास समकक्ष १२ पदं निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. कामाची मागणी मोठय़ा प्रमाणावर असल्याने आणि कामं सुरु असलेले तसेच जास्तीत जास्त मजूर उपस्थिती असलेल्या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी २ अशा १२ पदांना भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, यवतमाळ, नंदुरबार, अहमदनगर, नांदेड, औरंगाबाद, पालघर (ठाणे) व उस्मानाबाद इत्यादी जिल्ह्यांचा समावेश आहे. या जागेचे पदनाम उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक असे करण्यात आले आहे. ही पदं अस्थायी स्वरुपाची राहणार असून, त्यांची नियुक्ती एक वर्षासाठी राहणार आहे. * मग्रारोहयोच्या कामासाठी ग्रामसेवकांना मदत व्हावी म्हणून ग्रामरोजगार सेवक, तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कामाचा ताण हलका व्हावा आणि योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी ही नवीन पदं निर्माण करण्यात आली आहेत. या पदांची उपयोगिता पडताळल्यानंतर, आवश्यकता असल्यास पदांना मुदतवाढ देण्यात येणार आहे.