शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

मराठवाड्यात नव्याने धरणे बांधावी लागतील, जयंत पाटील यांचे सुतोवाच

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 9:11 AM

Marathwada News: मराठवाड्यातील पाण्याचे दुर्भिक्ष कमी करण्यासाठी नव्याने धरणे बांधावी लागतील. १०२ ऐवजी १२२ टीएमसी क्षमतेपर्यंत धरणे बांधली, तरी किमान ९० टीएमसी पाणी वापरता येईल, असे मत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी रविवारी व्यक्त केले. 

औरंगाबाद : मराठवाड्यातील पाण्याचे दुर्भिक्ष कमी करण्यासाठी नव्याने धरणे बांधावी लागतील. १०२ ऐवजी १२२ टीएमसी क्षमतेपर्यंत धरणे बांधली, तरी किमान ९० टीएमसी पाणी वापरता येईल, असे मत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी रविवारी व्यक्त केले. मध्य गोदावरी खोऱ्यातील १९.२९ आणि पैनगंगा खोऱ्यातून ४४.५४ टीएमसी पाणी मराठवाड्यात वापरण्यास परवानगी दिल्याबद्दल मराठवाडा अभियंता मित्रमंडळातर्फे आयोजित सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, रोहयोमंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आ. सतीश चव्हाण आदींची उपस्थिती होती.     जलसंपदामंत्री पाटील म्हणाले, मध्य गोदावरी खोरे आणि पैनगंगा खोऱ्यातील पाणी मिळाले आहे. त्यासाठी ५ ते ७ वर्षांत बरेचसे प्रकल्प पूर्ण होऊन मराठवाड्याला शाश्वत पाणी मिळेल. १९.२९ टीएमसी वापरामुळे मराठवाड्यातील धारूर, परळी, पालम, पूर्णा, कंधार, लोहा, भोकर, औंढा, वसमत तालुक्यात नवीन प्रकल्प बांधता येतील. नांदेड जिल्ह्यातील लहान-मोठ्या ४० प्रकल्पांना आजच मंजुरी दिली आहे. बीड जिल्ह्यातील प्रकल्पांनाही मंजुरी देण्यात येईल. ४४.५४ टीएमसीतून हिंगोली, औंढा, कळमनुरी, हिमायतनगर, माहूर, यवतमाळ परिसराला फायदा होईल. एक हजार अभियंत्यांची कमतरता आहे. मात्र, लवकरच भरतीचा मार्ग मोकळा होईल, असेही पाटील यांनी सांगितले. 

दमणगंगेचे पाणी वळविण्यासाठी प्रयत्न सुरू सह्याद्रीच्या माथ्यावरून पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ठाणे जिल्ह्यातून ११५ टीएमसी पाणी, कोकणातून पाणी आणू शकतो. त्यासाठी अंदाजपत्रक, नव्याने सर्व्हेक्षणाची गरज आहे. नार-पार, दमणगंगा, वैतरणा, उल्हास नदीच्या उपखोऱ्यांत ३७० अब्ज घनफूट पाणी शिल्लक आहे. ११५ अब्ज घनफूट पाणी वळू शकते. ७.५ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यात आले आहे.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलDamधरणMarathwadaमराठवाडा