आमच्या वरचेही आमचं नेतृत्त्व मानत नाहीत - लक्ष्मण मानेंची खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2019 09:43 PM2019-08-03T21:43:32+5:302019-08-03T21:44:04+5:30

आमच्यासारख्या छोट्या जातींना राजकीय प्रतिनिधीत्त्व अजिबात मिळाले नाही.

Neither of us believes in our leadership : Laxman Mane | आमच्या वरचेही आमचं नेतृत्त्व मानत नाहीत - लक्ष्मण मानेंची खंत

आमच्या वरचेही आमचं नेतृत्त्व मानत नाहीत - लक्ष्मण मानेंची खंत

Next

पुणे : बौद्ध, वंजारी, मातंग आदी जातींना राजकीय प्रतिनिधीत्त्व मिळाले. पण आमच्यासारख्या छोट्या जातींना राजकीय प्रतिनिधीत्त्व अजिबात मिळाले नाही. जातीबद्ध समाजातले अगदी वरचे तर आम्हाला स्विकारतच नाहीत. पण उतरंडीत आमच्या वरअसणारेही आमचे नेतृत्त्व स्विकारत नाहीत, अशी खंत महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी व्यक्त केली.  
बेलदार, कंजारभाट, वडार, कैकाडी यासारख्या बलुतेदारांमधल्या छोट्या जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती याच खºया अथार्ने वंचित आहेत. आम्हीच गेलो होतो प्रकाश आंंबेडकरांकडे आमचे नेतृत्त्व करा म्हणून सांगायला. पण उंट तंबूत शिरला आणि आम्हालाच बाहेर पडावे लागले. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या ४१ लाख मतांमध्ये आमचाही वाटा मोठा आहे,ह्णह्ण असे माने यांनी स्पष्ट केले. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत आंबेडकर कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आघाडीत सहभागी होणार असतील तर मी दोन मिनिटात माझा अजेंडा गुंडाळून त्यांच्यासोबत जाईन, असेही माने म्हणाले. शनिवारी (दि. ३) ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. 
शासकीय आकडेवारीनुसार राज्यात विमुक्त जाती अणि भटक्या जमातींची संख्या १२ टक्के आहे. परंतु, गेल्या सत्तर वर्षात आम्हाला राजकीय प्रतिनिधीत्व दिले गेले नाही. अनुसूचित जाती जमातीतल्या कैक जाती सत्तेपासून कोसो दूर आहेत. आम्हाला सोडूनच ७० वर्षांचा कारभार झालेला आहे. त्यामुळे खरा वंचितांचा पक्ष आमचाच आहे. महाराष्ट्रीय मुस्लिमांची स्थितीसुद्धा आमच्यापेक्षा वेगळी नाही. त्यांचे नेतृत्त्वही राज्याबाहेरुन येणाºया श्रीमंत मुस्लिमांनी केले आहे, असे माने म्हणाले. 

तर राक्षसा बरोबरही जाऊ
विधानसभा निवडणुकीत आम्हाला जागा सोडण्यासंदर्भात कोणत्याच पक्षाने प्रतिसाद दिलेला नाही. येत्या ९ आॅगस्टपर्यंत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी जागा वाटपासंबंधी आमच्याशी सन्मानपूर्वक बोलणी केली नाहीत तर आम्ही उजव्या, प्रतिगामी पक्षांबरोबरही तडजोड करु शकतो. परंतु, उपेक्षित वंचित समाजाला सत्तेत घेऊन गेल्याशिवाय थांबणार नाही. मग राक्षसाशी तडजोड करावी लागली तरी चालेल, असे लक्ष्मण माने म्हणाले. मात्र नंतर खुलासा करताना ते म्हणाले, की ह्यतिकडेह्ण रांगा लागल्या आहेत. आमची काय गरज त्यांना? आम्हाला ते घेणार नाहीत, आम्ही पण जाणार नाही. 

चौकट
 राज्यात साठ-सत्तर जागा लढवण्याचे आमचे नियोजन आहे. यातल्या पाच-सात जागा तर निश्चितपणे जिंकता येतील. ऐनवेळी उमेदवार ठरवणे शक्य नसल्याने स्वतंत्र लढण्याची तयारी आम्ही चालू केली आहे.-लक्ष्मण माने 

Web Title: Neither of us believes in our leadership : Laxman Mane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.