पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील फेसबुकवरील पोस्ट प्रकरणी देऊ चोडणकर यांची नि:पक्ष चौकशी केली जाईल, अशी ग्वाही पोलीस महासंचालक टी. मोहन यांनी दिली आहे. चिंबल येथील अभियंते चोडणकर यांनी मार्चमध्ये टाकलेल्या पोस्टमुळे निर्माण झालेला वाद सध्या गाजत आहे. चोडणकर यांनी आगामी काळात धार्मिक तणाव निर्माण होऊ शकतो, अशा प्रकारची पोस्ट टाकल्याची अतुल पै काणे यांनी तक्रार केली आहे. चोडणकर यांनी चौकशीला सहकार्य करावे. आम्ही पक्षपातीपणे वागणार नाही, असे टी. मोहन म्हणाले. (खास प्रतिनिधी)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}